Chhatrapati Sambhaji Raje : शिंदे-फडणवीस, बिळातून बाहेर या, सांगा हे राज्यपाल नकोत ; संभाजीराजे संतापले

Chhatrapati Sambhaji Raje : . छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून भाजपा, शिंदे गटाने बंदमध्ये सहभागी व्हायला हवं होतं,
Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapati Sambhaji RajeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राज्यापालांना परत बोलवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोर्चाची हाक दिली आहे.

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पिंपरी-चिंचवड येथे सर्वपक्षीय आंदोलकांच्या सभेत बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.

Chhatrapati Sambhaji Raje
BJP Politics: मोदी-शाह यांचे ‘प्रो इन्कंबन्सी‘ चे नवे समीकरण ; ऐतिहासिक विजयाची 'ही' आहेत वैशिष्ट्ये

छत्रपती संभाजी राजे म्हणाले, "जो त्यांचा अवमान करतो त्याला महाराष्ट्रात राहण्याची अधिकार नाही. सगळ्यांनी एकत्र यायला हवं, पण का येत नाहीत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे संस्कार आपल्याला दिलेले नाहीत, विरोधी पक्षात असतो तरी बंदमध्ये सहभागी झालो असतो. छत्रपती शिवाजी महाराजांपुढं काही ही नाही. माझं चॅलेंज आहे या व्यासपीठावरून. छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयातून दैवत मानत असाल तुम्ही सुद्धा जाहीर पणे एकत्र व्यापीठावर यायला पाहिजे आणि सांगायला हवं महाराजांचा अवमान झालेला आहे."

शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे तर तुम्ही गप्प का आहात? अस म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करत तुम्ही वर काय निरोप पोहचवला हे सांगा. महाराष्ट्रातून त्या भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी झाली पाहिजे हे तुम्ही सांगितलं का? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला तेव्हा सर्वात अगोदर मी आवाज उठवला. त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी केली. किती दिवस संयम ठेवायचा ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित होते.

Chhatrapati Sambhaji Raje
Sharad Pawar : पवारांच्या मध्यस्थीमुळे दोन संघटनांमधील 'कुस्ती' बरोबरीत सुटली..; लांडगे आखाड्याबाहेर !

"प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, हे बोलले आहेत. यांच धाडस तरी कसं होतं. महाराष्ट्र बंद हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून भाजपा, शिंदे गटाने बंदमध्ये सहभागी व्हायला हवं होतं," असे संभाजीराजे म्हणाले.

"शिवाजी महाराज यांच्या पुढे जाऊच शकत नाही. नुसतं असं म्हणून चालणार नाही. आता वेळ आलीय ऍक्शन घेण्याची. राज्यपाल म्हणून कोश्यारी यांना किंमत दिली. इथं यायचं आणि काही ही बोलायचं? हे ऐकून घ्यायच. बिळातून बाहेर या आणि सांगा आम्हाला हे राज्यपाल नकोत. त्यांना कुठं पाहिजे तिथं पाठवून द्या. महाराष्ट्राच्या बाहेर पाठवून द्या," अशा शब्दात छत्रपती संभाजी राजे यांनी शिंदे- फडणवीस यांना सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com