Uddhav and Raj Thackeray share the stage at Shivaji Park during the MNS Deepotsav event, symbolizing a renewed Thackeray unity before upcoming elections. Sarkarnama
मुंबई

BJP Vs Thackeray : ठाकरेंचा हिंदुत्वाचा रंग विरला म्हणणाऱ्या शेलारांवर राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस अन् राष्ट्रवादी, स्वत:ची पोरं...'

Sanjay Raut vs Ashish Shelar : मनसेने शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या दिपोस्तवाचं उद्घाटन ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्रित आल्याचं स्पष्ट झालं असून ही एकी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये देखील अशीच राहणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेने स्पष्ट केलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 18 Oct : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या दिपोस्तवाचं उद्घाटन ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्रित आल्याचं स्पष्ट झालं असून ही एकी आगामी महापालिका निवडणुकांमध्ये देखील अशीच राहील असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

मात्र, ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरेंनी आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा शिवाजी पार्कवर केल्या होत्या, पण त्यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यत जाईपर्यंकत विरला, असा टोला शेलारांनी उद्धव आणि राज ठाकरेंना लगावला.

शेलारांच्या याच टीकेला आता ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शेलारांनी आता राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, उगाच नाटक करायला जाऊ नये, असं म्हणत राज आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही रंग पक्के आहेत, ठाकऱ्यांचा रंग खरवडून काढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असं राऊत म्हणाले.

तर भाजपचा रंग राहिलाय का? भाजपचा रंग भ्रष्टाचाराचा, काँग्रेसचा रंग आहे. त्यांच्या पक्षात 90 टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ते आहे की नाही हे शेलांरानी सांगावं. भाजपमध्ये स्वत:चं नेतृत्व आहे का? असा सवाल करत भाजपला उद्देशून राऊत म्हणाले, 'त्यांना सांगा आता स्वत:ची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार? पाळणे तेवढेच आहेत, पण पोरं वाढत चालली आहेत', असा टोला राऊतांनी लगावला आहे.

शिवाय यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट केलं. 'मिस्टर फडणवीस साहेब, तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देत आहात. राजकारण करताना तुम्ही जपून करा, कारण आम्ही तुमच्या आधीपासून महाराष्ट्राच्या रस्त्यावर राजकारणात आहोत.', असं राऊत म्हणाले.

तर जसजशा स्थानिकच्या निवडणुका जवळ येत आहेत. तसे महायुतीतील मतभेद उफाळून आल्याच पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेत, ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करणार असून ही युती पक्की आहे. शिवाय महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे आणि ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार हा एक ज्वलंत प्रश्न आहे, असंही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT