BJP News : ठाकरे, शिंदे, पवारांची माणसे फोडा! भाजपचे मिशन महापालिका : 2029 डोळ्यांसमोर ठेवून आतापासून पायाभरणी

BJP Mission Local Body Election 2025 : महापालिका निवडणुकीत ज्या प्रभाग, वार्डांमध्ये भाजपाची ताकद नाही, तिथे विरोधकांना फोडा असे आदेशच स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News
Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपाचं "जिथे कमी तिथे फोडा" हे धोरण महापालिकांपासून सुरू होत असून 2029 विधानसभा निवडणुकांपर्यंतचा रोडमॅप तयार केला आहे.

  2. स्थानिक पातळीवर विरोधकांना कमजोर करून भाजप स्वबळावर राज्यात सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे.

  3. मिशन महापालिका हे भाजपचं केवळ निवडणूक नव्हे तर 2029 साठीचं मोठं राजकीय सराव मैदान ठरतंय.

सचिन पवार

Marathwada Political News : भाजपाने आता ताकही फुंकून पिण्याचे धोरण अवलंबले आहे. 2019 मध्ये शिवसेना-भाजपाला स्पष्ट बहुमत मिळूनही महाविका आघाडीचा प्रयोग झाल्याने भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेत्याची भूमिका वठवावी लागली. याचा वचपा थेट शिवसेनेला खिंडार पाडून फडणवीस-भाजपाने घेतला. पण अडीच वर्ष पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाणी सोडून उपमुख्यमंत्री व्हावे लागले.

राज्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी असूनही पाच वर्ष मुख्यमंत्री पदापासून वंचित राहावे लागल्याने भाजपाने आता आगामी 2029 मध्ये विधानभा निवडणुकीत स्वबळावर लढून शतप्रतिशत सरकार आणण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची वाटचाल सुरू झाली आहे. मिशन महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी पक्षाकडून सुरू असली तरी त्यांचे टोर्गेट मात्र पुढची विधानसभा निवडणूक असल्याचे बोलले जाते.

महापालिका निवडणुकीत ज्या प्रभाग, वार्डांमध्ये भाजपाची (BJP) ताकद नाही, तिथे विरोधकांना फोडा असे आदेशच स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या प्रभागात, गटात सर्वेक्षणात आपण मागे दिसत आहोत तिथे ठाकरे, शिंदे आणि पवारांची माणसे फोडा. त्यांचा पक्षप्रवेश करून घ्या. 2029 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढायची आहे. त्यामुळे आताची निवडणूक हलक्यात घ्यायची नाही, अशी रणनीती भारतीय जनता पक्षाने तयार केली आहे. या तयारीसाठीच पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा स्तरावर दोन बैठका झाल्या आहेत.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News
BJP Politics : 'अब की बार 70 पार', ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा, एकनाथ शिंदेंना घेरलं!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विभागनिहाय पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. मराठवाड्याचाही आढावा सहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. त्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही टास्क सांगितले होते. ते पूर्ण केले का, याची माहिती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सहाव्याच दिवशी घेतलेल्या बैठकीतून घेतली. यात निवडणुकींसाठी विशेष रणनीतीही तयार करण्यात आली.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News
Devendra Fadnavis: फडणवीसांचा मोठा निर्णय! महसूलमधील 22 अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; 23 अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS होणार

यामध्ये कुठल्या गट, प्रभागात भाजप 'ए' म्हणजे चांगल्या स्थितीत आहे, कुठे 'बी'मध्ये आहे आणि कुठे 'सी'मध्ये याची माहिती त्यांनी जाणून घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बारकाईने लक्ष देण्यासाठी काम करण्याच्या हेतूने पाच जणांची कोअर कमिटी आणि 15 जणांची निवडणूक समन्वय समिती अशा दोन समित्या असणार आहेत. त्यांच्यामार्फत स्थानिक स्तरावर काही निर्णय होतील. त्यांना काही सूचना करता येतील.

फोडाफोडीवच भर

महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत आपले जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढायच्या असल्याने, हे संख्याबळ पक्षासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठीच पक्षाकडून फोडाफोडीचे राजकारण करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

'बी'मधील प्रभागांत सर्वाधिक लक्ष

जे प्रभाग 'ए'मध्ये आहेत तेथेही इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांवर नजर ठेवा, त्यांचे प्रवेश करून घ्या. परंतु, ज्या प्रभागात आणि गटात म्हणजेच 'बी' प्रकारात आपण मागे आहोत, तिथे प्राधान्याने उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह इतर पक्षांची माणसे फोडा, त्यांचे पक्षप्रवेश आपल्याकडे करून घ्या, 'बी'मध्ये असलेले प्रभाग 'ए'मध्ये कसे आणता येतील यासाठी वाटेल ती मदत पक्ष करणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या प्रभागात आपले दोन उमेदवार तगडे आहेत, तिथे इतर दोन दुसऱ्या पक्षाचे घ्यायचे. तुमच्यामुळे पक्ष चालला, असे समजू नका, कुणाचे प्रवेश अडवू नका, विरोधक कमी ठेवायचे अशी रणनिती भाजपाच्या वरिष्ठांनी महापालिकेसाठी आखली आहे.

FAQs

1. भाजपाचं "जिथे कमी तिथे फोडा" हे धोरण नेमकं काय आहे?
→ ज्या ठिकाणी भाजपाचं संघटन कमी आहे, तिथे विरोधकांच्या मतांत फूट पाडून स्वतःची ताकद वाढवण्याचं हे धोरण आहे.

2. मिशन महापालिका म्हणजे काय?
→ राज्यातील महापालिका निवडणुका जिंकून स्थानिक पातळीवर भाजपचं मजबूत जाळं निर्माण करणे हे या मिशनचं उद्दिष्ट आहे.

3. भाजपाचं अंतिम लक्ष्य काय आहे?
→ 2029 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापनेचं लक्ष्य भाजपाने ठेवले आहे.

4. या धोरणामुळे कोणते पक्ष जास्त प्रभावित होतील?
→ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे शहरी व ग्रामीण पातळीवरील गट सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com