uddhav thackeray sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांवर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, देश अन्...

Uddhav Thackeray On Bjp : "देशात भाजपविरोधात कोणी लढू शकत नाही, असं वातावरण होतं. भाजपचा 'अंजिक्य'पणा महाराष्ट्राच्या जनतेनं ताकदीनं दाखवून दिला आहे," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Akshay Sabale

Uddhav Thackeray News : आमचा गुजरातबद्दल राग नाही. 'इंडिया' आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं देऊ. पण, नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश, अशी भिंत उभी करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

तशी भिंत मोदी आणि शाहांनी उभी करता कामा नये, असा सल्लाही ठाकरेंनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) शरद पवारसाहेब ( Sharad Pawar ), काँग्रेस नेते, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते, बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, "आमचा गुजरातबद्दल राग नाही. 'इंडिया' आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं देऊ. पण, नरेंद्र मोदी आणि अमित शाह गुजरात आणि संपूर्ण देश, अशी भिंत उभी करत आहेत. ती अत्यंत घातक आहे. तशी भिंत त्यांनी उभी करता कामा नये."

"महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. गुजरातचे जे असेल, ते जरूर गुजरातला द्या. अन्य राज्यांना हक्कांचं आणि आवश्यक असलेले दिलं गेलेच पाहिजे. त्यालाच केंद्र सरकार म्हणतात. पण, केंद्र सरकार हा शब्द चुकीचा आहे. कारण, आपली संघराज्य पद्धत आहे," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

"देशात भाजपविरोधात कोणी लढू शकत नाही, असं वातावरण होतं. भाजपचा 'अंजिक्य'पणा महाराष्ट्राच्या जनतेनं ताकदीनं दाखवून दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. आर्थिक आणि यंत्रणेच्या दृष्टीनं ही लढाई फार विचित्र होती. मात्र, संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई होती," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT