Sharad Pawar : ...म्हणून शरद पवारांनी मानले मोदींचे आभार

Maha Vikas Aghadi Press Conference : "लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अन्य पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला."
Maha Vikas Aghadi Press Conference
Maha Vikas Aghadi Press ConferenceSarkarnama

Maha Vikas Aghadi Press Conference : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता महाविकास आघाडीने विधानसभेच्या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. काहीही झालं तरी विधानसभेचं मैदान मारायचंच या हेतूने आता आघाडीचे नेते कामाला लागल्याचं दिसत आहे.

अशातच विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी (ता.15 जून) रोजी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला. लोकसभेला आमचे जास्त उमेदवार विजयी होण्याला मोदींच्या सभा कारणीभूत ठरल्याचं पवार म्हणाले.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अन्य पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. ज्या ठिकाणी त्यांच्या सभा आणि रोड शो झाला त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे आता विधानसभेला जेवढ्या जागांवर मोदींच्या सभा होतील ते आमच्या फायद्याचं ठरेल. शिवाय आम्हाला स्पष्ट बहुमतासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं मी माझं कर्तव्य समजतो." अशा शब्दात पवारांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला.

Maha Vikas Aghadi Press Conference
Mns VS Eknath Shinde : "मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं, पण दाढीवाल्यांची मदत करणं योग्य नाही", मनसेची बोचरी टीका

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना अजित पवारांबाबत संघाने केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "अजित पवारांबद्दल संघ बोलत असेल तर त्यांचा अनुभव ते सांगत असतील." तसंच कांदा उत्पादन करणारा शेतकरी नाराज होता, आजही काही बदल त्यात झाला असा वाटतं नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारने अद्याप कांदा उत्पादकांच्या मागण्याचा विचार केला नसल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून लोकसभेसारखेचं ताकदीनं आम्ही लढू, सत्ता परिवर्तन निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com