Uddhav Thackeray Vs Dhananjay Chandrachud Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Vs Dhananjay Chandrachud : उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनाच सुनावले...

Uddhav Thackeray displeasure over Supreme Court delay in Shiv Sena NCP pending case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दाखल याचिकेवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिरंगाई होत असल्याच्या प्रकारावर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात नाराजी व्यक्त केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हं कोणाचं, याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यावर उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर विश्वास आहे, असे सांगून खटल्याला होत असलेल्या दिरंगाईबाबत चिमटे घेतले.

शिवसेना, राष्टवादी पक्ष कोणाचे याबाबत दाखल याचिकेवर 50-60 वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी आम्हाला न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "सरन्यायाधीशी धनंजय चंद्रचूड यांच्यावर विश्वास आहे. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाबाबतचा निर्णय 50-60 वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे, असे म्हणतात, सभागृहात हशा पिकला. याच्यात चुकीचे काम बोललो मी, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला". आम्ही लवकरची तारीख मागत आहोत. पण, त्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणते, तुम्ही आम्हाला आदेश द्यायचा नाही. पण आम्ही त्यांच्यासमोर हात जोडून उभे असे सांगतो आहे. या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी आम्हाला न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

बांगलादेशाच्या तुलनेवरून संतापले

सर्वोेच्च न्यायालयाचे (Court) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणाची बातमी उद्धव ठाकरे यांनी दाखवली. बांगलादेशामुळे स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित. बांगलादेशमुळे! ज्या बांगलादेशाला आपल्या हिंदुस्थानला स्वतंत्र, त्या बांगलादेशामुळे आपल्या देशामुळे स्वातंत्र दिन अधोरेखित होणार असेल, कशाला या देशाला जन्माला आलो. कोणत्या पदावर आपण बसलोत. दुसऱ्या देशात काय झाले. बांगलादेशामुळे स्वातंत्र्य अधोरेखित, महत्त्व आले असेल, पण तेथील हुकुमशाही, दडपशाही होती, त्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. पंतप्रधान, सरन्यायाधीश यांना राजीनामा द्यावा लागला. ही लोकशाही तुम्हाला परवडणार आहे? स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल, तर भूतकाळात डोकवावे लागेल. हे आपले चंद्रचूडजी बोलत आहेत.

रामशास्त्री प्रभूणे यांची आठवण

भूतकाळ डोकवावा लागेल. आमचा समस्या आहे, आम्ही भूतकाळात डोकवतो, तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभूणे दिसतात. रामशास्त्री प्रभूणे, राघोबादादाला देहांत प्रायचित्ताची शिक्षा देणारे रामशास्त्री प्रभूणे आम्हाला भूतकाळात दिसतात. आपण कधीतरी भूत होणार आहोत, भूतकाळात जाणार आहोत. देशाचे स्वातंत्र्य, त्याचे महत्त्व कळण्यासाठी भूतकाळात डोकवावे लागले, तर राजकारणी म्हणून काय करतो आहोत, देशाचे सरन्यायाधीश म्हणून तुम्ही काय केलं आहात, त्यावेळच्या भूतकाळात नमूद झालेले असेल, चंद्रचूड साहेब! आज जी लढाई लढत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

सरन्यायाधीश चंद्रचूड बांगलादेशाबाबत काय म्हणाले...

स्वातंत्र्य किती मोलाचे आहे, याची कल्पना आज बांगलादेशात जे काही चालले आहे, त्यावरून येते. पण स्वातंत्र्याचे मोल समजण्यासाठी इतिहासात डोकावण्याची गरज आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले होते. स्वातंत्र्य दिनाचा दिवस हा आपल्याला संविधानातील सर्व मूल्यांची जाणीन करून देतो आणि राष्ट्रापती आपले कर्तव्य पार पाडतो, असेही चंद्रचूड यांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT