Uddhav Thackeray : शिवसैनिक बेचैन, अस्वस्थ... ठाकरेंसाठी मिलिंद नार्वेकरांमार्फत धाडलं पत्र... कारण की!

Letter from Shiv Sena workers to Milind Narvekar for Uddhav Thackeray : विधानसभान निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत अस्वस्थ असलेल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना मिलिंद नार्वेकर यांच्याकडे पत्र पाठवून वाट मोकळी करून दिली. उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसैनिक बेचैन, अस्वस्थ आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांची ही अस्वस्थता स्वतःसाठी नसून पक्ष संघटनेसाठी आहे. विधानसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख असतील, असे संकेत काँग्रेसने दिलेत.

यातच महाविकास आघाडीचा मेळावा आज मुंबईत होत असताना शिवसैनिकांनी आपल्याती अस्वस्थेतेला शिवसेनेचे नेते आमदार मिलिंद नार्वेकर यांना पत्र लिहत वाट मोकळी करून दिली आहे.

महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मेळाव्यात मार्गदर्शन करतील. परंतु शिवसैनिकांना उत्सुकता आहे ती, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या मेळाव्यात काय भाषण करतात, याची! शिवसैनिकांची अस्वस्थता पक्षप्रमुख ठाकरेंपर्यंत मिलिंद नार्वेकरांनी पोचवली की नाही, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. शिवसैनिकांची ही अस्वस्था नेमकी आहे तरी काय, हे देखील पाहणं गरजेचे आहे.

Uddhav Thackeray
Sharad Pawar : 'नगर जिल्हा बँकेत काय शिजतंय...'; विखेंना टोला लगावत पवारांनी थोरातांकडे व्यक्त केली चिंता

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटल्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले. काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाला तुलनेत काहीशा एकमेकांच्या जवळपास जागा मिळाल्या. आता विधानसभा निवडणुका होत आहेत, महाविकास आघाडी पुन्हा एकत्रितपणे निवडणुकांना समोरे जाण्याचा निर्णय पक्षांनी घेतला आहे. मात्र शिवसैनिकांची अस्वस्थता वेगळीच आहे.

Uddhav Thackeray
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत दोन मोठे बदल, आता 'या' महिलांनाही मिळणार लाभ!

महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फक्त प्रचारासाठी वापर करून घेतील आणि स्वतःच्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणतील. जे लोकसभा निवडणुकीत घडले, तेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष करेल, आणि ठाकरे पक्षाला मागे टाकतील, या विचाराने शिवसैनिक अस्वस्थ झाला आहे. बेचैन आहे. या अस्वस्थेला शिवसैनिकांनी नेते आमदार मिलिंद नार्वेकर यांना पत्र लिहून वाट मोकळी करून दिली आहे. शिवसैनिकांचे हे पत्र समोर येताच महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात काहीतरी धुसफूस असल्याची आता कुजबूज समोर येऊ लागली आहे.

शिवसैनिकांच्या पत्रात काय...

मिलिंदजी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित म्हणून महाविकास आघाडीकडून घोषणा होत असेल, तर उद्धव साहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे, अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे 'मशाली'चेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल. महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही. लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील, आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील. मुख्यमंत्रीपदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येते. त्यामुळे आपण देखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील, तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार प्रत्येकाने आपल्या पक्षाने प्रचार करावा, असं ठरविण्यात यावे आणि तीच रणनीती ठेवावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com