Ramdas Kadam on Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : रामदास कदम यांना 'करारा जवाब' मिळणार; ठाकरेंनी सर्वात विश्वासू शिलेदारावर टाकली महत्वाची जबाबदारी  

Anil Parab’s Role as Trusted Aide of Uddhav Thackeray : रामदास कदम यांच्या आरोप, दाव्यांना आता ठाकरेंकडून उत्तर दिले जाणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्वात विश्वासू सहकारी आमदार अनिल परब यांची निवड केली आहे.

Rajanand More

Ramdas Kadam to Face Strong Political Reply : शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी धक्कादायक आरोप केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत ठेवला होता, असा दावा त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाताचे ठसे घेतले, असा दावा कदमांनी केला आहे. आता त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्युत्तर दिले जाणार आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदम उद्धव ठाकरेंवर तुटून पडले होते. या मेळाव्यात बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत केलेल्या विधानावर ते शुक्रवारीही ठाम राहिले. आपण भाषणाच्या ओघात ते बोलल्याचे आज कदम यांनी सांगितले. पण त्यावर आपण ठाम असल्याचे सांगत उद्धव ठाकरे आणि आपली नार्को टेस्ट करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

रामदास कदम यांच्या आरोप, दाव्यांना आता ठाकरेंकडून उत्तर दिले जाणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्वात विश्वासू सहकारी आमदार अनिल परब यांची निवड केली आहे. कदम यांच्या आरोपांना परब यांच्याकडून शनिवारी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले जाणार आहे. त्यामुळे परब नेमके काय-काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आज खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे आदी नेत्यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली होती. आता अनिल परब शनिवारी कदम यांच्यावर पलटवार करणार आहेत. परब आणि कदम यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. अत्यंत टोकाचा राजकीय विरोध दोघांकडूनही होतो.

रामदास कदम यांनी आपले पुत्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी परब प्रयत्नशील होते, असा आरोप कदम यांनी अनेकदा केला आहे. मुलाबाबतीत त्यांनी इतर अनेक गंभीर आरोपही केले होते. परब यांनी कदम यांच्या मुंबईतील डान्सबारचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मुद्द्यावरून कदम आणि परब यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. आता पुन्हा एकदा रामदास कदम यांना अनिल परब हे कसे प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT