Uddhav Thackeray|Devendra Fadanvis
Uddhav Thackeray|Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : भाजपनं सांगावं त्यांच्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय?, ठाकरेंचा संघावर वार!

सरकारनामा ब्यूरों

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) दहावा स्मृतीदिन आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जावून अभिवादन केले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिंदे गटावर बरसून टीका केली.

सावरकरांवर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान टीका केली होती. यावर ठाकरे यांना सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना शिवसेनेचं समर्थन कसं? असा प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले की, राहुल गांधींशी सहमत नाही, ते चूकच आहे. परंतु भाजपनं आधी स्पष्ट करावं की, त्यांच्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध आहे का ? असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी थेट राष्ट्रीय स्वंयंसेवक संघावर टीका केली.

शिवसेना प्रमखांच्या नावाने बाजार भरवू नये, यांना बाळासाहेब कळायला काहींना १० वर्ष लागली, असाही टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला. ज्यांना संपूर्ण देशाचा ताबा हवाय, तिथे स्मारकाचं प्रश्न काय़? असेही ठाकरे म्हणाले.

संघाचा स्वातंत्र्यलढ्याशी कसला संबंधच नाही. संघाला दोन तीन वर्षात 100 वर्ष पूर्ण होतील. स्वातंत्र्य लढ्यात यांचं योगदान तरी काय? हे आधी सांगा. ज्यांच्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही, अशांनी आम्हाला प्रश्न करू नयेत. निजामांच्या काळात हिंदूं धर्मीयांवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? तेव्हा हिंदूंवरील अत्याचार का थांबले नाही? असे प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT