दादा भुसे हे विकासकामांत भेदभाव करणारे मंत्री!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार रशीद शेख यांच्या आरोपाने मालेगावात पूर्व- पश्‍चिम राजकारण तापले.
Dada Bhuse & Rashid Shaikh
Dada Bhuse & Rashid ShaikhSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : महानगरपालिकेत (Malegaon) प्रशासकीय राजवट असताना अंदाजपत्रकाची (Budget) अंमलबजावणी व विकासकामांच्या निधी वाटपावरुन शहरात पुन्हा पूर्व- पश्‍चिम राजकारण तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh) यांनी मोर्चा काढण्याचा इशारा देत, पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सोयीच्या भागातच कामे केली, असा आरोप केला. (Poor quality works from guardian minister Dada bhuse`s fund)

Dada Bhuse & Rashid Shaikh
काँग्रेसने केले राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे वस्त्रहरण!

शहरात पश्‍चिम भागातील विकासकामांसाठी निधी मिळावा. आठ दिवसात निविदा काढून कामांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे प्रभाग कार्यालयास तोडफोड करुन टाळे ठोकले. त्याचे तातडीने पडसाद उमटले.

Dada Bhuse & Rashid Shaikh
जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई सरकारवरच उलटली!

माजी आमदार तथा माजी महापौर रशीद शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांसह बुधवारी महापालिकेत धडक देत अंदाजपत्रकातील मंजुरीनुसार अंमलबजावणी व्हावी. समसमान निधी वाटप व्हावा. राजकीय दबावाखाली निधी वाटप खपवून घेणार नाही, असा इशारा देत २३ नोव्हेंबरला मोर्चा व महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेत काही महिन्यांपूर्वी सत्तारुढ असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना हेच एकमेकांवर आरोप करीत असल्याने हे आरोप- प्रत्यारोप बदलत्या समीकरणाची नांदी आहे. माजी महापौर ताहेरा शेख यांनी २०२२- २३ चे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या दबावाखाली अंदाजपत्रक तरतुदीचे वाटप थांबवून ठेवले आहे. निधी वाटप समसमान पद्धतीने न झाल्यास मुख्य सचिव व नगरविकास विभागाकडे तक्रार करु, असे श्री. शेख यांनी सांगितले.

शंभर कोटीच्या विकास कामांच्या निविदा प्रक्रियेत अवघ्या तीन मक्तेदारांनी घेतलेला सहभाग शंका निर्माण करीत असल्याचे म्हटले आहे. पश्‍चिम भागातील विकास कामे निकृष्ट दर्जाचे होत आहे. पालकमंत्री भरभरुन निधी असताना झालेली कामे कोठे आहेत, असा सवाल करत श्री. भुसे यांच्यावरही त्यांनी कठोर शब्दांत टिका केली. प्रशासनाने निधीचे समान वाटप न केल्यास तसेच अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार आठ दिवसात निधी वितरण करुन निविदा प्रक्रिया सुरु न केल्यास २३ नोव्हेंबरला महापालिकेवर मोर्चा नेण्याचा व द्वारबंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. समर्थकांसह आयुक्तांच्या दालनात या विषयी आज अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सुहास जगताप, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, मुख्य लेखापरिक्षक राजू खैरनार, शहर अभियंता कैलास बच्छाव आदींसह वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांना या मागणीचे निवेदन सादर केले.

शिष्टमंडळात माजी महापौर ताहेरा शेख, माजी नगरसेवक अस्लम अन्सारी, शकील बेग, ताजोद्दीन अमीनोद्दीन, फकीरा शेख, विठ्ठल बर्वे, शाहीद अहमद, कमरुन्निसा रिजवान, जैबुन्निसा पप्पु अलाऊन्सर, सलीम अन्वर, निहाल हाजी, इम्रान शेख, मेहमूद शाह आदींसह बहुसंख्य माजी नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com