Electronic Voting Machine Sarkarnama
मुंबई

EVM Controversy: ईव्हीएमचे ‘योगदान’ आरोप-प्रत्यारोप ; एका दिवसात इतकी मते कशी मोजली? ठाकरेसेनेचा सवाल

Election results EVM contribution sparks opposition questions: भारतीय ईव्हीएम याबाबत अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांना पडलेला ‘प्रश्न’ असेल, पण भारतीय सुज्ञ नागरिकांसाठी मात्र ईव्हीएम हे मागील दहा वर्षांतील असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे ‘उत्तर’ आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: विधानसभा मतमोजणीनंतर ईव्हीएमवर अनेकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएममध्ये घोळ करुन महायुती जिंकून आली, असा आरोप विरोधक करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बैठकीत ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत संशय व्यक्त करीत विविध तक्रारी करण्यात आल्या आहेत. ठाकरे सेनेने 'सामना'तून ईव्हीएमवर टीकेचे बाण सोडले आहेत.

महाराष्ट्रात लागलेल्या निकालामधील ईव्हीएमचे ‘योगदान’ यावरून मोठ्या प्रमाणात वादंग, चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता थेट अमेरिकन उद्योगपती आणि टेस्ला तसेच स्पेसेक्ससारख्या जगविख्यात उद्योगांचे प्रमुख एलॉन मस्क यांची भर पडली आहे. भारतातील ईव्हीएम प्रणालीबद्दल त्यांना प्रचंड अप्रूप वाटले आहे.

24 तासांत एवढी मते मोजणारी भारतीय ईव्हीएम हा भले अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांना पडलेला ‘प्रश्न’ असेल, पण भारतीय सुज्ञ नागरिकांसाठी मात्र ईव्हीएम हे मागील दहा वर्षांतील असंख्य अनुत्तरित राजकीय प्रश्नांचे ‘उत्तर’ आहे. यामुळेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून चार दिवस उलटूनही ईव्हीएमच्या ‘सुरस’ कथा चव्हाट्यावर येत आहेत, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

भारतीय ईव्हीएमच्या मतमोजणीच्या वेगावरून आपण अचंबित झालो आहोत, असेही मस्क यांनी म्हटले आहे. काहींना यात मस्क यांनी भारतीय मतदान व्यवस्थेचे कौतुक केले असे वाटले आहे. ईव्हीएमबद्दल त्यांची प्रतिक्रिया म्हणजे ईव्हीएमच्या सत्यतेबाबतचे जणू प्रमाणपत्रच, असेच त्यांना वाटत आहे. मात्र याच मस्क महाशयांनी फक्त सहाच महिन्यांपूर्वी भारतीय ईव्हीएम यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

एका दिवसात एवढी मते कशी मोजली...

‘एआय’ किंवा माणसांकडून ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा स्पष्ट आक्षेप मस्क यांनी त्या वेळी घेतला होता. एवढेच नव्हे तर ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र आता त्याच मस्क महाशयांना म्हणे भारतीय ईव्हीएम यंत्रांनी एका दिवसात एवढी मते कशी मोजली, याबद्दल आश्चर्याचा धक्का बसला आहे, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’

भारतीय ईव्हीएमने एवढी मते मोजली म्हणून अमेरिकेतील एलॉन मस्क हैराण आहेत तर भारतीय जनता मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि घटक पक्षांच्या पारड्यात महाप्रचंड मत‘दान’ कसे झाले? विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ सत्ताधारी महायुतीला कसा लागला? या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे, असा टोला अग्रलेखातून सत्ताधारी भाजपला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT