Sanjay Raut, Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

संजय राऊतांना उद्धव ठाकरे भेटू शकतात,पण...

Uddhav Thackeray|Sanjay Raut : संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी द्यावी,असा निरोप ठाकरे यांच्यामार्फत पाठवण्यात आला होता.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडी (ED) कडून अटक करण्यात आली आहे. राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

दरम्यान राऊतांची भेट घेण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) इच्छुक होते. मात्र, आर्थर रोड कारागृह प्रशासनाकडून त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे ठाकरेंना या भेटीसाठी कोर्टाची परवानगी घेण्याचे निर्देश आर्थर रोड कारागृह प्रशासनाने दिल्याचे समजते. यामुळे आता ठाकरेंना राऊत यांची भेट घ्यायची असल्यास कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे. (Sanjay Raut, Uddhav Thackeray Latest News)

जेल अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊत यांना भेटायला द्यावे,असा निरोप ठाकरे यांच्यामार्फत ऑर्थर रोड कारगृह कार्यालयात पाठवण्यात आला होता. मात्र यावर कारागृह प्रशासनाने नकार देत, अशी भेट घेता येणार नाही. त्यासाठी आपल्याला कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल, असे कारण जेल प्रशासनाकडून देण्यात आले. यामुळे ठाकरेंना राऊत यांना परवानगी मिळेपर्यंत भेटता येणार नाही. कारागृह कायद्यानुसार कुठल्याही कैद्याला भेटण्याची परवानगी ही रक्ताच्या नातेवाईकांनाच मिळत असते. नेमकं याच कायद्यावर बोट ठेवत ऑर्थर रोड कारगृह प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली आहे. यामुळे ठाकरेंना आधी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल, आणि त्यानंतरच राऊतांना भेटता येणार आहे.

दरम्यान, राऊत यांना गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी गैरव्यवह झाल्याच्या आरोपाखाली ईडीकडून 1 ऑगस्टला रात्री अटक करण्यात आली होती. याआधी त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. सुरूवातीला राऊतांना 4 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. 8 ऑगस्ट रोजी त्यांची ईडी कोठडी संपल्यावर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने राऊतांची आणखी काही दिवस कोठडी मागितली होती. राऊतांच्या वकिलांच्या युक्तिवादानंतरही त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT