Dasara Melava latest news
Dasara Melava latest news sarkarnama
मुंबई

Dasara Melava : आव्वाज कुणाचा ? ; राणांचा दावा खरा ठरला ; ठाकरेंचे भाषण फुसका बार, शिंदेंनी तोफ डागली..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दसरा मेळाव्यानिमित्त (Dasara Melava) बुधवारी ठाकरे-शिंदेंच्या तोफा धडाडल्या. मेळाव्यानिमित्त दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुंबईत रंगलेला कलगीतुरा राज्याने पाहिला. (Dasara Melava latest news)

आपलाच ‘आव्वाज’ सर्वत्र घुमावा, यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली होती, त्यासाठी अत्याधुनिक ध्वनिवर्धक यंत्रणेची व्यवस्था केली होती. 'उद्धव ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील भाषण म्हणजे फुसका बार होता,' असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. राणा यांचा हा दावा ध्वनिप्रदूषणाची नोंदणीवरुन खरा ठरला आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अन्य नेत्यांचा आवाज अधिक असल्याची नोंदीवरुन दिसते.बीकेसीच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज अधिक होता. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ८८.४ डेसिबल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज ८९.६ डेसिबल होता.

Dasara Melava latest news

शिवाजी पार्क येथील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात १०१.६ डेसिबल; तर बीकेसी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात ९१.६ डेसिबलपर्यंत आवाजाची नोंद झाली. त्यामुळे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)च्या तुलनेत शिवाजी पार्कवर अधिक ध्वनिप्रदूषण झाल्याची माहिती आवाज फाउंडेशनच्या पाहणीत स्पष्ट झाले.

पेडणेकरांचा आवाज सर्वाधिक

शिवाजी पार्कवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सर्वाधिक ९७ डेसिबल आणि अंबादास दानवे यांचा आवाज ९६.६ डेसिबल नोंदवण्यात आला. शिंदे गटाच्या मेळाव्यात किरण पावसकर व धैर्यशील माने यांचा आवाज ८८.५ डेसिबल इतका होता. आवाज फाऊंडेशनच्या प्रमुख सुमायरा अब्दुलाली यांनी ही माहिती दिली. आवाज फाऊंडेशन ही पर्यावरणासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे.

  • शिंदेंच्या भाषणाचा आवाज उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या तीव्रतेपेक्षा जास्त होता.

  • शिंदेंच्या भाषणाच्या आवाजाची सर्वाधिक तीव्रता 89.6 डेसिबल होती.

  • उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सर्वाधिक तीव्रता 88.4 डेसिबल इतकी नोंदवण्यात आली.

  • शिवाजी पार्क हा निवासी क्षेत्रात येत असल्याने येथे ५५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे; येथे सर्वाधिक १०१.६ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली.

  • बीकेसीच्या एमएमआरडीए मैदान परिसरात ६५ डेसिबलची मर्यादा आहे, येथे ९१.६ डेसिबल आवाज नोंदवण्यात आला

  • बीकेसी मैदानावर शिंदेंच्या एन्ट्रीला तर शिवतीर्थावर पेडणेकरांच्या भाषणाने सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT