Shinde vs Thackeray : ठाकरेंच्या मेळाव्यात या दोन नेत्यांचे भाषण ठरलं हिट, शिंदे, राणेंवर 'प्रहार'

Shinde vs Thackeray : . शिंदे गटासोबतच दोघा नेत्यांचे लक्ष्य होते केंद्रीयमंत्री नारायण राणे.
Shinde vs Thackeray  latest news
Shinde vs Thackeray latest newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतील फूटीनंतर झालेला दसरा मेळावा हा ऐतिहासिक ठरला. शिवसेनेला गळती लागल्यानंतर आक्रमक नेते रामदास कदम, गुलाबराव पाटील हे शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आक्रमकपणे व्यासपीठावर शिवसेनेचा किल्ला कोण लढविणार, असा प्रश्न विचारला जात होता. (Shinde vs Thackeray news update)

शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत सध्या कारागृहात असल्यामुळे मेळाव्यात त्यांची उणीव शिवसैनिकांना भासत होती. मात्र, ठाकरेंच्या दोन शिलेदारांनी कडवी झुंज देत विरोधकांवर तुडून पडल्याचे चित्र काल दिसले. शिंदे गटासोबतच दोघा नेत्यांचे लक्ष्य होते केंद्रीयमंत्री नारायण राणे.

Shinde vs Thackeray  latest news
Shinde vs Thackeray : धनुष्यबाण कुणाला ? उद्याचा दिवस महत्वाचा..

शिवसेनेचा आवाज अशी ओळख असलेले अनेक दिग्गज नेते आणि आमदार-खासदार शिंदे गटात गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातून शिवसेनेची आक्रमकता कोण मांडणार याबाबत नक्कीच उत्सुकता होती. ही कसर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भरुन काढली.

सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्या भाषणाना जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर या दोघांचे भाषण हिट ठरले.

सुषमा अंधारे

नारायण राणे यांच्यावर कडाडून टीका करताना सुषमा अंधारे अधिक आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी राणे यांच्या मुलांचा उल्लेख त्यांनी ‘ वाह्यात बाजारबुणगे’ असा केला. शिवसेना कॉंग्रेससोबत गेली, अशी टीका करणाऱ्या राणेंना अंधारेंनी राणे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या कॉंग्रेसमधील राजकीय जीवनाची आठवण करुन दिली बंडखोरांचा उल्लेख 'गद्दार' असा करत या नेत्यांनी केलेल्या पक्षांतराचा जोरदार समाचार घेतला. ठाकरे कुटुंबाने हिंदुत्व कधीच सोडले नाही. पण, आज जे गद्दार शिवसेनेतून गेले आहेत ते केवळ ईडी, सीडी आणि सीबाआयच्या धाकाने गेले आहेत. या धाकानेच त्यांना हिंदुत्त्व आठवले आहे, अशी जहरी टीका अंधारे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरण पावस्कर, प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांवर सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडलं. शिंदे गटाला हिंदुत्त्वाशी सोयरसुतक राहिले नाही. त्यांना फक्त भाजपला मदत करायची आहे, अशा शब्दात अंधारे यांनी त्यांना फटकारले.

भास्कर जाधव

सभागृहात आणि सभागृहाबाहेर आक्रमकपद्धतीने शिवसेनेची बाजू मांडणारे भास्कर जाधव काल मेळाव्यात नेहमीपेक्षा आक्रमक दिसले. "नारायण राणे यांच्यावर जोरदार 'प्रहार' केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच नारायण राणे यांना मोठे केले असे असले तरीही अजून हे शिपाईच राहिले आहेत. ज्या धनुष्यबाणावर हे निवडून आले तोच धनुष्यबाण गोठविण्यासाठी शिंदे गटाकडून यांचा प्रयत्न आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अनेक मतभेद होते. शिवसेनेने काँग्रेसवर नेहमीच जहाल टीका केली. परंतू, असे असले तरी त्यांनी कधीही शिवतिर्थावर दसरा मेळाव्यास शिवसेनेला परवानगी नाकारण्याचे पाप केले नाही. हे पाप शिंदे गटाने केले. एक सच्चा शिवसैनिक हे कधीही विसरणार नाही," असे भास्कर जाधव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com