Mumbai News: काँग्रेसमध्ये ‘शिवराळ संस्कृती’ असून कर्नाटकच्या जनतेने त्यांना धडा शिकविण्यासाठी मतदान करताना 'जय बजरंगबली' असा उच्चार करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता त्यावर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी 'जय भवानी जय शिवराय'चा नारा देत मराठी द्वेष्ट्यांना हरवा असं मराठी भाषिकांना आवाहन करतानाच भाजपवर हल्लाबोलही केला आहे.
उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्यातील चालू घडामोडींसह कर्नाटक निवडणुकीतील प्रचारावरही भाष्य केलं. ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक निवडणुकीतील प्रचारादरम्यान बजरंग बली की जय म्हणून मतं मागितली. पण आता बेळगावातील मराठी माणसांची एकी तूटू देऊ नका.आणि मराठी माणसांची वज्रमूठ वापरुन आता तुम्ही जय भवानी जय शिवराय म्हणून मतदान करा आणि मराठी द्वेष्ट्यांना हरवा असं आवाहन मराठी भाषिकांना ठाकरेंनी यावेळी केलं.
ठाकरे म्हणाले, मी नरेंद्र मोदीं(Narendra Modi)विरोधात नाहीतर हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात आहे. या हुकुमशाहीविरोधात विरोधकांकडून आवाज उठविला जात आहे. तसेच यावेळीमाझ्याकडून एकीला तडा जाणार जाईल असं काही होणार नाही असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
... म्हणून वज्रमूठ सभेच्या तारखांमध्ये बदल
मागील काही दिवसांपासून वज्रमूठ सभेविषयी संभ्रम निर्माण करणारे विधानं महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे म्हणाले, उष्णतेच्या कारणामुळे वज्रमूठ सभेच्या तारखा बदलत आहोत. कारण या सभेसाठी लोक दुपारपासून येत असतात. पण आगामी काळात पुन्हा वज्रमुठ सभा होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बारसू प्रकल्पावरुन निशाणा..
उध्दव ठाकरेंनी बारसू प्रकल्पावरुन पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी ठाकरे म्हणाले, आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यातील चांगले प्रकल्प राज्याबाहेर गेले. पण माझ्या काळात येणारे प्रकल्प बाहेरच्या राज्यात का जात आहेत असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. कोणत्याही प्रकल्पांसाठी स्थानिक नागरिकांवर जबरदस्ती नको. तसेच स्थानिकांसमोर प्रकल्पाचं सादरीकरण करायला हवं. स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन प्रकल्प करण्यात यावा असंही ठाकरे यावेळी म्हणाले. (Political Short Videos)
मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निवडणुकीतील प्रचारादरम्यान मोठं विधान केलं होतं. मोदी म्हणाले, मी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची यंत्रणा मोडित काढल्यामुळे त्या पक्षाचे नेते माझा तिरस्कार करतात आणि माझ्याबाबत अपशब्द वापरतात. काँग्रेस निवडणुकीत एकतर त्यांच्या निवृत्त होत असलेल्या नेत्यांच्या नावे मते मागते किंवा दुसरा मार्ग म्हणजे मोदींना शिव्या दिल्या जातात.
कर्नाटकातील जनता ही शिवराळ संस्कृती खपवून घेईल का, कर्नाटकची जनता अपशब्द वापरणाऱ्यांना माफ करेल का, आता तुम्ही काय कराल, तुम्ही त्यांना शिक्षा कराल का, तुम्ही जेव्हा मतदानकक्षात जाल, तेव्हा यंत्रावरील बटण दाबताना जय बजरंगबली म्हणा आणि त्यांना शिक्षा करा असंही मोदी यावेळी म्हणाले. (Political Web Stories)
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.