Satara News : शिंदेंची शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट; ४० आमदारांसह वजीर गायब होणार...

Mahesh Shinde News: राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडीवर आमदार महेश शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना गौप्यस्फोट करत टोलेबाजी केली.
Ajit Pawar, Mahesh Shinde
Ajit Pawar, Mahesh Shindesarkarnama
Published on
Updated on

Mahesh Shinde News : शरद पवार Sharad Pawar साहेब हुशार आहेत. त्यांना कळाले आहे की आपला वजीर निघून चालला आहे. अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.लवकरच ४० आमदारांहस वजीर गायब होणार आहे. त्यामुळे पक्ष टिकवण्यासाठी श्री. पवार यांना हे सर्व करावे लागत आहे, असा गौप्यस्फोट कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांनी केला आहे.

राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडीवर आमदार महेश शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना गौप्यस्फोट करत टोलेबाजी केली. शरद पवारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, याविषयी विचारले असता महेश शिंदे म्हणाले,पवार साहेब हुशार आहेत. त्यांना कळले होते की वजीर निघून चालला आहे. अख्खा राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता.

लवकरच ४० आमदारांसह वजीर गायब होणार होता, तो थोड्यादिवसांनी होणारच आहे. आज त्यांना पक्ष टिकवण्यासाठी हे सर्व करावे लागत आहे. राष्ट्रवादीतूनच मुख्यमंत्रीपदासाठी दोघे इच्छुक असल्याबद्दल विचारले असता महेश शिंदे म्हणाले, प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे आहे. एका घरात दोन मुख्यमंत्री कसे होणार हा प्रश्न आहे, ज्यांची क्षमता आहे त्यांना मुख्यमंत्री करायला हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Political Short Videos)

Ajit Pawar, Mahesh Shinde
Satara News : पवारांचा निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी; भूमिका बदलावी... बाळासाहेब पाटील

वज्रमुठ होतीच कुठं...

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेविषयी विचारले असता महेश शिंदे म्हणाले, मुळात वज्रमुठ होतीच कुठं... असा प्रश्न वज्रमुठ करायला अंगात ताकत लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वज्र व मुठ कधीच गायब केली आहे. त्यामुळे वज्र पण नाही आणि मुठही नाही अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली.

Ajit Pawar, Mahesh Shinde
Koregaon APMC News : कोरेगावात लोकांच्या उद्रेकाला सुरवात; विरोधकांचे गणित त्यांच्यावरच उलटले... शशिकांत शिंदे

राष्ट्रवादीच्या निर्णयाचा उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर परिणाम होणार का, यावर महेश शिंदे म्हणाले, जमिनच आपली नाही ही जमीन विकली गेली आहे. सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे. त्यांना वाटत होते, ज्या जमिनीवर उभे राहिलो ती जमिनच आपली नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. (Political Web Stories)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com