Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

BJP Politics : ठाकरेंची टीका फडणवीसांना झोंबली; मनोरुग्ण म्हटल्याने भाजपकडूनही जशास तसा पलटवार

Uddhav Thackeray : मुर्खांच्या नंदनवनात वावरणारे सदैव मनोरुग्णालयातच असल्यासारखे वागतात, बावनकुळेचाही ठाकरेंवर पलटवार

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News :

अभिषेक घोसाळकरांची दहिसरमध्ये झालेली हत्या आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेला गोळीबार यामुळे भाजप बॅकफूटवर गेला आहे. त्यात विरोधकांकडून खास करून उद्धव ठाकरेंची टीका भाजपला खूप झोंबली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपनं ट्विट करून ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाकरे गटाचे मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची 8 फेब्रुवारी रोजी रात्री दहिसरमध्ये हत्या करण्यात आली. फेसबुक लाइव्ह सुरू असताना मॉरिस नोरोन्हा या आरोपीने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) टीकेचे धनी ठरले आहेत, पण ठाकरेंनी केलेली टीका त्यांच्या जिव्हारी लागत असल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि भाजप महाराष्ट्रने (BJP) ट्विट करून ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'मी पूर्वी त्यांना कलंक, फडतूस म्हणायचो. ते फारच सौम्य होतं. कालच्या त्यांच्या 'श्वान'च्या प्रतिक्रियेनंतर राज्याला लाभलेले गृहमंत्री मनोरुग्ण आहेत, असं मला वाटतंय' अशी एक घाव दोन तुकडे करणारी टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर आज दुपारी केली. एवढेच नाही तर 'गाडीखाली श्वान आले तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील' या देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचाही समाचार ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतला.

'संस्कृत शब्द बोलले म्हणजे सुसंस्कृत होत नाही. निर्घृण मनाचा, निर्दयी गृहमंत्री राज्याला मिळाला आहे आहे. एक हत्या असताना त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता? तुम्ही तुमची शेपटी दिल्लीश्वरांच्या समोर हलवता, अशी अत्यंत कडवट टीका ठाकरेंनी फडणवीसांवर केली. ही टीका फडणवीस तसेच भाजपला फारच झोंबली आहे.

त्यानंतर भाजपनं ट्विट करत 'गँगवॉर (Crime) सरकारमध्ये नाही तर तुमच्या उबाठा गटात सुरू आहे. उबाठा गटातील दोन लोकांनी गोळ्या घातल्या आणि गँगवॉर सुरू केलं. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडली आहे,' असा पलटवार केला आहे.

तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे किस्से तुमच्याच पक्षातील आमदार कसे चघळत होते. ते सांगावेत का?, असा सवालही केला आहे. एवढंच नाही तर 'अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात. जनतेला सोडा साधं तुमच्या लोकांनाही भेटत नव्हता. आपल्याच पक्षातील नेत्यांना, आमदारांना 'मातोश्री'वर ताटकळत ठेवत होता. या सर्व घटना उभ्या महाराष्ट्रानं पहिल्या आहेत. त्यामुळे शेळपट लोकांनी फुकाच्या गप्पा मारू नयेत,' असे भाजपनं सुनावलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या शिवाय 'फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येक वेळी तुमचे रुसवे फुगवे दूर करीत तुम्हाला सोबत घेतले, पण तुम्ही कायम त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत राहिलात. हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे,' अशी टीकाही भाजपने ट्विटच्या सुरुवातीला केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही उत्तर दिलं आहे. फडणवीसांचा मनोरुग्ण असा उल्लेख केल्यामुळे बावनकुळेंनीही 'मुर्खांच्या नंदनवनात वावरणारे सदैव मनोरुग्णालयातच असल्यासारखे वागतात,' असा पलटवार ठाकरेंवर केला आहे. शिवाय 100 कोटींची वसुली, पत्राचाळीतून मराठी माणसांची लूट, पालघर साधू हत्याकांड, यावर एकदा मनसोक्त बोला, असे आव्हानही ठाकरेंना दिलं आहे. याउपर 'उबाठा बरे व्हा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा!' असं ट्विट करून भाजपनं ठाकरेंना टोला लगावला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT