Mumbai : राज्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात महेश गायकवाडवर गोळीबार केला, तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर माॅरिस याने गोळीबार करत त्यांची हत्या केली. या प्रकरणानंतर उद्ध ठाकरे यांनी कायदा सुव्यवस्थेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. 'मी पूर्वी त्यांना कलंक, फडतूस म्हणायचो ते फार सौम्य होते. कालच्या त्यांच्या 'श्वान'च्या प्रतिक्रियेनंतर राज्याला लाभलेले गृहमंत्री मनोरुग्ण आहेत, असे मला वाटत आहे,' असा घणाघाती हल्ला देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केला.
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की 'गाडीखाली श्वान आले तरी गृहमंत्र्याला राजीनामा मागतील'त्यांच्या याच वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. 'संस्कृतमध्ये शब्द बोलले म्हणजे सुसंस्कृत होत नाही. निर्घूण मनाचा, निर्दयी गृहमंत्री राज्याला मिळाला आहे आहे. एक हत्या असताना त्याची बरोबरी श्वान बरोबर करता. तुम्ही तुमची शेवटी दिल्लीश्वरांच्या समोर हलवता, अशी जहरी टीका ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्यावर केली.
काही घडले तर त्यासाठी त्या खात्याचा मंत्री जबाबदार असतो. मात्र या सरकारमधील मंत्री एकमेकांकडे बोटसुद्ध करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी आहे. मात्र तेच गुंडाना पोसत आहेत. त्यांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही. त्या पदाला काही अर्थ राहिला नाही. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय यावर लवकरच निर्णय घेईल, असा विश्वास देखील ठाकरे यांनी व्यक्त केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.