Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : ''सहनही होत नाही, सांगताही येत नाही! याचे उत्तम उदाहरण म्हणजे, देवेंद्र फडणवीस''

Devendra Fadnavis News : कर्नाटकच्या सरकारने पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यावीर सावरकरांचा धडा हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis News : कर्नाटकच्या सरकारने पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यावीर सावरकरांचा धडा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. त्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीस यांना टोला लगावला.

शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने मुंबईमध्ये आज (ता.१८) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. ठाकरे म्हणाले, पहे देवेंद्रजी तुमची परिस्थिती फार हालाकीची आहे हो!, तुम्ही बोलताय ठिका आहे, पुर्वी जाहिरात यायची. सहनही होत नाही, सांगता ही येत नाही, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

ठाकरे म्हणाले, जे सगळे अपमान होत आहेत, ते सहनही होत नाहीत आणि धड सांगताही येत नाहीत. कारण करणार काय वरुन आदेश आहे. देवेंद्रजी सावरकारांचा धडा वगळला त्याबद्दल निशेष आहेच, पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल सहन केले. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. तो देश जी एखादी विचारधारा ज्यांचा स्वातंत्र्य संग्रमात काडीचाही संबंध नव्हता. ती विचारधारा जोखडाखली आणू पाहते, त्याबद्दल तुमचे मत काय, असा प्रश्व ठाकरे यांनी केला.

सावरकारांची मत काय आहेत, सावरकारांनी हाल सहन केले ते काय मोदी आणि फडणवीसांसाठी केले का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. मी फडणवीसांना सांगतोय जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर तुमच्या वरती बसले आहेत ना, तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा, असे आव्हान ठाकरे यांनी फडणवीसांना दिले.

तसेच पुस्तकांमध्ये तुम्ही खाराखोड केली. इतिहास बिघडवून काही होत नाही, इतिहास घडवावा लागतो. सुरुवात तुम्ही केली, शेवट कुणी करायचा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT