Mumbai : '' आमदार फोडून सत्ता मिळवता येते. पण तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं सोबत असणं ही माझी खरी ताकद आहे. लाचार मिंधे सत्तेसाठी आणि खोक्यासाठी ते भाजपसोबत गेले. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. आणि परवा जागतिक गद्दार दिन आहे'' म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी शिंदे गटाला डिवचलं आहे.
शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं राज्यव्यापी शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात शिवसेना पक्षप्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी-शाह यांच्यासह शिंदे फडणवीसांनाही जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, तुमच्यात हिंमत असेल तर मणिपूरमध्ये जावं. सत्तेची मस्ती उतरायला वेळ लागणार नाही. अमेरिकेत विकत घेतलेल्या लोकांसमोर विश्वगुरु आपलं ज्ञान पाजळतात. पण त्यांना मणिपूरमध्ये जायला वेळ लागणार नाही असा टोलाही पंतप्रधान मोदीं(Narendra Modi) ना लगावला.
'' गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा...''
ठाकरे म्हणाले, गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावानाचं नेतृत्व करायला मला आवडेल. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तर परवा जागतिक गद्दार दिन आहे. तुम्ही आधी हात उचलू नका, पण कुणी केला उचलला तर तो हात वेगळा करा असा आदेशही ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. आम्ही नामर्दाची औलाद नाही. यापुढे आमच्या पानिपतच्या युध्दावेळी ही अब्दाली बाहेर पडून आला होता. त्याचं नावही शाह होतं. अमित शाह नाही असा टोलाही उध्दव ठाकरे यावेळी लगावला.
जे जाणारे आहेत त्यांना जाऊ द्या. तुम्हांला देण्यासाठी माझ्याकडे सध्या आता काही नाही. पण तरीदेखील तुम्ही साथ देत आहात. त्यामुळे कितीही शाह अफझलखान आले तरी फरक पडणार नाही. तुमची मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही असंही ठाकरे म्हणाले.
''आमची एकजूट विरोधकांची नाही तर....''
सरकारकडून मुंबई लूट सुरु आहे. आमची एकजूट विरोधकांची नाही तर देशप्रेमींची आहे. जे देशावर प्रेम करतात, त्यांनी आमच्यासोबत यावं असंही आवाहनही ठाकरेंनी यावेळी केलं. तसेच सरकारमध्ये राहूनही फडणवीसांची परिस्थिती फार हलाखीची आहे. सांगताही येत नाही,दाखवताही येत नाही असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला. दिल्लीश्वरांकडून मुंबईची लूट होतेय हे माहितीय का ? असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.