Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंचे तडफदार भाषण.. पण राष्ट्रवादी किंवा काॅंग्रेसचे नावही नाही घेतले!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकार यांना धारेवर धरले. स्वबळाचा नारा दिला. मराठी माणसाने भेदाभेद विसरावेत पण हिंदुत्वाचीही कास सोडू नये, असा सल्ला आजच्या दसरा मेळाव्यता दिला. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जोरदार मांडणी केली. पण या संपूर्ण 50 मिनिटांच्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील आपल्या घटक पक्षांचे नाव घेतले नाही. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना त्यांनी या मेळाव्यात का दुर्लक्षित केले असावे, असा प्रश्न या निमित्ताने साहजिकच पडला.

या पक्षांचे सहकार्य मिळते अथवा मिळत नाही, सरकारची धोरणे म्हणून एकत्रित कसे काम करतो, याबद्दल ते अजिबातच बोलले नाहीत. मात्र भाजप आणि केंद्राला जोरदार चोपले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला.

त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

-बंगालचे अभिनंदन केले. ती तयारी महाराष्ट्राची असली पाहिजे. कोणी किती वार केले तर शस्त्र तोडून पार्सल परत पाठवता आले पाहिजे. हे (भाजप) इंग्रजांप्रमाणे फोडा आणि राज्य करा वागतील.. मराठी- अमराठी भेद संपवून सर्व हिंदू एकत्र आले पाहिजे.

-आपण महाराष्ट्राला पुढे न्यायचा प्रयत्न करत आहेत तर हे महाराष्ट्राला बदनाम करत आहे..महाराष्ट्राने नाकारलं म्हणून राज्याच्या प्रतिमेवर ऍसिड फेकत आहेत?

-कोण एक सेलिब्रिटी त्याला पकडायचे, ढोल वाजवायचे.. बातमी एकच जामीन झाला का?

-संपूर्ण जगात महाराष्ट्रात गांजा,चरस मिळतो, असे चित्र करत आहेत..का करताय असं? मुंद्रा अदानी बंदर करोडो रुपयांचे ड्रग सापडले,कुठे आहे हे बंदर? पोलिसांनी दीडशे कोटी गांजा पकडला आहे

-मी मुख्यमंत्री आहे, हिंदुत्ववादी आहे.. मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांशी समानतेने वागतोय..

-शिवसेनेनं उगीच कुणावर हल्ला केला का? हे माझं राज्य त्यांना झुकतं माप..पण हे त्याचं राज्य त्यांना हाकलून देतो.. हे बरोबर नाही.

-कारण नसताना दुसऱ्याचे कुटुंब,घर उध्वस्त करत आहे सत्तेच्या लालसेपोटी हे आधी संपवलं पाहिजे

-केंद्राची लुडबुड चालता कामा नये हे सर्व राज्यांनी ठरवण्याची वेळ आली आहे

- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे तर अमृत मंथन करायची वेळ आली आहे..

-देशातील संघराज्य पद्धत यावर चर्चा झाली पाहिजे..केंद्राचे अधिकार काय ,राज्याचे अधिकार काय आहेत?

-महाराष्ट्रात काही झालं की लोकशाहीचा खून झाला गळा काढायचा..मग उत्तर प्रदेशमध्ये काय झालं? तिथे लोकशाहीचा मळा फुलला आहे का?

फडणविसांवर जोरदार टीका

फडणवीस यांच्या मी अजूनही मुख्यमंत्री पदावर आहे असे वाटते या वक्तव्यावर टीका त्यांनी केला. काही जणांना वाटत होते की मी पुन्हा येईन. पण ते आलेच नाहीत. आता ते मी गेलोच नाही. मी गेलोच नाही, असे म्हणत असल्याचे ठाकरे यांनी सांगताच सभेत हशा उसळला. पदे येतात आणि जातात. मात्र त्याचा अहंकार नको, असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. तो अहंकार आला की संपला. त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून कधी वावरलो नाही. जनतेशी नम्रपणे राहिलो. त्यासाठी जनतेचे प्रेम कमवावे लागते, अशा भाषेत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT