Amol Mitkari Sarkarnama
मुंबई

Amol Mitkari : अमोल मिटकरी यांना सचिन आहिरांनी भरवला पेढा, पण अर्धाच; काय आहे कारण?

Sachin Ahir : महायुतीमध्ये तीनही पक्ष मजबूत आहे, मी माझी भूमिका मांडत आलो. पण मित्र पक्षांनी माझी लायकी काढावी एवढा मी छोटा नाही, अशा शब्दात मिटकरींनी सुनावले आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आंदोलन करून वातावरण तापवलेही. मात्र यात काही अनपेक्षित गोड घटनांही घडल्या आहेत.

त्यात सत्ताधारी-विरोधकांतील नेत्यांनी एकमेकांना भरवलेल्या पेढ्याची चर्चा खूपच रंगली. यात मात्र विरोधातील ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांना अर्धाच पेढा भरवला. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी महाविकास आघाडीला लोकसभेत 31 जागा मिळाल्याने पेढ्यांचे वाटप केले. त्यानंतर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांना पेढा भरवून अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्याची चर्चा आहे.

यातच सचिन आहिर यांनी अमोल मिटकरींना पेढा भरवला, मात्र तो अर्धाच होता. त्यामुळे अजित पवार गटाचे लोकसभेतील यशापश, आगामी विधानसभेच्या जागावाटपांबाबत सुरू असलेल्या चर्चांचा संबंध जोडून चर्चा सुरू झाल्या आहेत.

याबाबत अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, सचिन अहिर माझे मित्र आहेत. ते मला नेहमीच पेढा भरवतात. आज त्यांनी मला पेढा भरवला, मात्र तो अर्धाच होता. अर्धा पेढा का भरवला, हे मी त्यांना विचारणार आहे. पण ते निघून गेले. कदाचित तालिका सभापती म्हणून माझी नियुक्ती झाली म्हणून मित्रत्वाच्या नात्याने म्हणून माझी पेढा भरवला असेल. मी त्यांचा मित्र आहे. त्यामुळे पेढ्याचं राजकारण करु नये, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे महायुतीत तेढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यावर छेडले असता ते म्हणाले, महायुतीमध्ये तीनही पक्ष मजबूत आहे, मी माझी भूमिका मांडत आलो. पण मित्र पक्षांनी माझी लायकी काढावी एवढा मी छोटा नाही. माझ्यावर दबाव कोणी टाकू शकत नाही. मी अजित पवारांना भेटणार आहे. काही बंधन शिवसेना व भाजपच्या नेत्यांवर आणावी. आमचे म्हणणे एवढंच की आमच्या पक्षाला कमी समजू नये. जास्तीत जास्त जागा लढाव्या ही माझी भावना आहे. समसमान वाटप व्हावे, असेही मिटकरींनी यावेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT