Mahayuti Dispute : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक आमदार महायुतीतून बाहेर पडणार; नागपूरच्या बड्या नेत्याचा दावा

Vikas Thakre Claim : लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी नव्हती. मी केवळ 15 दिवसांत लोकसभेची निवडणूक लढवली आहे
Vikas Thakre
Vikas ThakreSarkarnama

New Delhi, 18 june : राज्यात मंत्रिपद कमी आणि इच्छुक जास्त अशी परिस्थिती आहे. महायुतीमध्ये आता जी धुसफूस सुरू आहे, ती मंत्रिमंडळ विस्तारानंतर आणखीन वाढल्याचं दिसून येईल. अनेक आमदार त्यांच्या मनासारखा वेगळा निर्णय घेऊ शकतात, असे वक्तव्य काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केले.

आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. दिल्लीत माध्यमांशी बोलताना महायुतीमधील (Mahayuti) धूसफुशीवर विकास ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्याची माझी तयारी नव्हती. मी केवळ 15 दिवसांत लोकसभेची निवडणूक लढवली आहे, पक्षाने एक वर्ष आधी मला तयारी करायला सांगितलं असतं, तर नागपुरात विजय मिळवून दाखवला असता.

विकास ठाकरे यांनी नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत गडकरी यांना 6 लाख 55 हजार 027 तर ठाकरे यांना 5 लाख 17 हजार 424 मते मिळाली आहेत. गडकरी हे 1 लाख 37 हजार 603 मतांचे लीड घेऊन विजयी झाले आहेत.

Vikas Thakre
CMP Leader Meet Sharad Pawar : कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पवारांची भेट; आडम मास्तरांसाठी मतदारसंघ सुटणार का?

नागपूर जिल्हा आणि विदर्भात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळालं आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही विदर्भातून काँग्रेस पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.

ज्या प्रकारे राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नाकारलं, त्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीतही भाजपला जनता नाकारणार आहे. त्यांनी (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट NCP) लोकसभा निवडणुकीचीही तयारी केलीच होती. पण, जनतेने त्यांना सपशेल नाकारलं, तोच अनुभव महायुतीला विधानसभा निवडणुकीत येईल, असा दावा आमदार विकास ठाकरे यांनी केला.

Vikas Thakre
Madha Lok Sabha Constituency : 'रणजितसिंह मोहितेंनी उघडपणे भाजपविरोधात काम केलं, त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा...' ; भाजप पदाधिकाऱ्याचा इशारा!

विकास ठाकरे म्हणाले, राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत. जागावाटपाचा निर्णय आमच्या काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बसून घेतील. प्रत्येक पक्ष निवडणुकीची तयारी करत असतो, तशी भाजपदेखील विधानसभेची तयारी करत आहे, त्यासाठीच त्यांची आज दिल्लीत बैठक होत असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com