मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष आता दसरा मेळाव्यांकडे लागेल आहे. पहिल्यांदाच शिवसेना (Shiv Sena) फुटून दोन मेळावे होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ताकद दाखवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच नियोजन ठाकरेंकडूनही करण्यात येत आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळाले आहे. मेळाव्यातल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचेच लक्ष असणार आहे. त्याचबरोबर कोणाच्या दसरा मेळाव्याला अधीक गर्दी असणार आहे, हा विषयही चर्चेचा असणार आहे. मेळाव्यासाठी ठाकरेकडून मायक्रो प्लानिंग करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतून प्रत्येक शाखेतून ४ बसेस निघणार आहे. मुंबईत एकूण शिवसेनेच्या २२७ शाखा आहेत. त्यामुळे जवळपास ९०८ बसेस या मुंबईतल्याच असणार आहे. मुंबईतुन ठाकरेंना यंदा ५० हजारांपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. यासाठी मुंबईतल्या विभागप्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर विभाग प्रमुखांची बैठक घेतली.
मुंबईत शिवसेनेचे १२ विभागप्रमुख आहे. प्रत्येक विभागप्रमुखाला दसरा मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक मधून मोठी गर्दी अपेक्षित आहे. मुंबईच्या बाहेरूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. खासदार राजन विचारे यांच्यावर ठाण्यासह, मीरा-भाईंदर व नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्याने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून ट्रेनने मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार, असल्याचे सांगण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.