Kolhapur : 'गोकुळ' स्वीकृत संचालक : झाकीर भालदार यांच्या नावाची चर्चा

भालदार Zhakir Bhaldar यांनी युवक कॉग्रेसमधून Youth Congress आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. हातकणंगले तालुक्यातील Hatkanangale अनेक सामाजिक चळवळीत भालदार यांनी सहभाग घेतला आहे
Zhakir Bhaldar
Zhakir Bhaldarsarkarnama

कोल्हापूर : राज्यातील सत्ताबदलनंतर आता सहकारी संस्थामधील शासकीय पदाधिकारी बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे संचालकपद रद्द झाल्याने आता नवीन शासन नियुक्त संचालक नेमण्यात येणार आहे. त्यावर खासदार माने गटाचे निष्ठावंत झाकीर भालदार यांना संधी मिळण्याची चर्चा असून खासदार धैर्यशील माने यांनीही त्यासाठी ताकद लावली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात गोकुळच्या शासन नियुक्त संचालकपदी नेमणूक झालेल्या शिवसेनेच्या मुरलीधर जाधव यांचे संचालकपद्द रद्द केल्याने आता गोकुळमध्ये नवीन शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Zhakir Bhaldar
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिंदे गटात गेलेल्या खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात आंदोलन करून खालच्या पातळीवर टीका केली. मुरलीधर जाधव यांच्या शिंदे गट विरोधाचा फटका त्यांना बसला असून गोकुळ दूध संघातील शासन नियुक्त संचालकपद रद्द करण्यात आले.

Zhakir Bhaldar
Maratha Reservation : खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनात दाखल.. 

आता खासदार धैर्यशील माने यांनी झाकीर भालदार यांच्यासाठी ताकद लावली आहे. भालदार यांनी युवक कॉग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. हातकणंगले तालुक्यातील अनेक सामाजिक चळवळीत भालदार यांनी सहभाग घेतला आहे तर धैर्यशील माने यांच्या बरोबरीने एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून संघटना बांधणीसाठी काम सुरू केले. सध्या हातकणंगले तालुक्यात मुस्लिम चेहऱ्याला संधी देऊन सोशल इंजिनिअरिंगचाही प्रयोगही केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com