Maharashtra Monsoon Session 2024  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे शिलेदार तीन मुद्यांवरुन शिंदे सरकारला जेरीस आणणार

Maharashtra Assembly Session 2024 Uddhav Thackeray Give Instructions To MLA : ठाकरे गटाने मुंबईतील ताज लँड या हॉटेलमध्ये आमदारांची बैठक झाल्याची माहिती आहे.उद्धव ठाकरे यांनी आमदारांना यावेळी महत्वाच्या सूचना दिल्या.

Mangesh Mahale

Maharashtra Monsoon Session 2024 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरवात होत आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना ड्रग्ज प्रकरण, सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी आणि होर्डिंग प्रकरण या तीन मुद्यांवरुन सरकार घेरण्याचे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले असल्याची माहिती आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी ठाकरे गटाने एक महत्वाची बैठक काल रात्री आयोजित केली होती. ठाकरे गटाने मुंबईतील ताज लँड या हॉटेलमध्ये आमदारांची बैठक झाल्याची माहिती आहे.उद्धव ठाकरे यांनी आमदारांना यावेळी महत्वाच्या सूचना दिल्या. विरोधकांना कुठल्या मुद्दांवर घेरायचं याबाबतची रणनीती आखण्यात आली.

विधीमंडळाच्या अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहा, अशा सचूना ठाकरेंकडून आमदारांना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, मुंबईतील होर्डिंग प्रकरण आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी यावरुन सरकारला घेरण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत. मी पूर्णवेळ अधिवेशनास उपस्थित राहणार आहे, असे ठाकरेंनी सांगितले. विद्यार्थी आणि बळीराजांच्या प्रश्नांवर सरकारला प्रश्न विचारा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवारी) शिंदे सरकारवर टिका केली. खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्यांनी मोदी सरकारवर टिका केली. दिल्ली, झारखंड,पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबलं.

कारण, ते भाजपविरोधी होते. विरोधी पक्षाचा आवाज जपला पाहिजे. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असा साक्षात्कार मोदींना गेल्या दहा वर्षांत झाला नाही" असे ठाकरे म्हणाले. विरोधकांना संपवण्यासाठी मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला, असा आरोप ठाकरेंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT