Uddhav Thackeray : "खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन", उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका

Uddhav Thackeray On Narendra Modi : "पंतप्रधान म्हणून मोदींनी संसदेत आणि बाहेर दहा वर्षे जे केले त्यास नौटंकी असेच म्हणतात," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
uddhav thackeray | eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
uddhav thackeray | eknath shinde | devendra fadnavis | ajit pawarsarkarnama

राज्य विधिमंडळांचे गुरूवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. काही महिन्यांतच विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे सरकारचे हे अखेरचं अधिवेशन आहे.

यातच शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका करत विधानसभेचं रणशिंग फुकलं आहे. खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. पदवीधर निवडणुकीचे मतदान केल्यावर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, "विरोधी पक्षाला संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी यांनी वापर केला. पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबलं. कारण, ते भाजपविरोधी होते. विरोधी पक्षाचा आवाज जपला पाहिजे. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असा साक्षात्कार मोदींना गेल्या दहा वर्षांत झाला नाही."

uddhav thackeray | eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Video Akhilesh Yadav : अखिलेश यादवांचे ओम बिर्लांना चिमटे; म्हणाले, तुमच्या इशाऱ्यावर संसद चालावी, याचे...

"मोदी ( Narendra Modi ) आणि त्यांच्या गुजराती 'ईस्ट इंडिया' कंपनी देश चालविण्याच्या नावाखाली उत्सव इव्हेंट, नाटकेच केली. मोदी आता म्हणतात की, 'देशाला एक जबाबदार विरोधी पक्ष हवा.' मात्र, दहा वर्षांत विरोधी पक्ष फोडून त्यांना कमजोर करण्याचं काम मोदी यांनीच केलं. देशात विरोधी पक्ष टिकूच द्यायचा नाही. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि बाहेर जे कोणी देशाच्या तसेच जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवतील अशांना भाजपत आणायचे किंवा तुरुंगात टाकायचे. हे मोदी यांचे धोरण विरोधी पक्ष मजबूत करण्याचे होते काय?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

uddhav thackeray | eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
Lok Sabha Speaker Om Birla: सहा वर्षांपूर्वी राहुल गांधींची मोदींसोबत गळाभेट, आता 'शेक हँड'; सभागृहात टाळ्यांचा कडकडाट..

"पंतप्रधान म्हणून मोदींनी संसदेत आणि बाहेर दहा वर्षे जे केले त्यास नौटंकी असेच म्हणतात. आता तेच बहुमत गमावल्यावर थोडे जमिनीवर आले आणि संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बोलून गेले की, 'देशाच्या जनतेला नौटंकी, धिंगाणा आणि घोषणाबाजी नको आहे. त्यांना एक चांगला आणि जबाबदार विरोधी पक्ष हवा आहे.' मोदींनी हे सांगणं म्हणजे हुकूमशहाने गीता वाचवण्यासारखेच आहे," असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com