Uddhav Thackeray Manipur  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Manipur : मोठी बातमी; उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांसह मणिपूरच्या राम मंदिरात जाणार...

Uddhav Thackeray Manipur : अशांत आणि हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यातल्या राममंदीरातही उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट जाणार आहे. नरेंद्र मोदींवर कुरघोडी...

Chetan Zadpe

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच नाशिक आणि नवी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. तर नाशिकच्या काळाराम मंदिरातही मोदी येणार आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये केंद्रीय मंत्र्यासह राज्यमंत्री मंडळ हजर होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान या दौऱ्यावरुन विरोधकांनी मोदींवर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजयॉ राऊच यांनी मोदींच सर्वात मोठे शंकराचार्य आहेत, अशा शब्दात खोचक टोला लगावला. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मणिपूरच्या राम मंदिरात जाणर असल्याचे सुतोवाच राऊतांनी केले. (Latest Marathi News)

संजय राऊत म्हणाले, "या देशातले सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत. म्हणून त्यानी विद्यमान शंकराचार्यांच्या भूमिकेला किंमत दिली नसावी. राम मंदिर कारसेवकाच्या त्याग-बलिदातून उभं राहिलं असं मोदींना वाटत नाही. न्यायालयाच्या आदेशातून राम मंदिर उभं राहिलं, असंही त्यांना वाटत नसावं. म्हणून त्यांना जसं हवं तसे सोहळे ते करुन घेत आहेत. शेवटी राजकारण आहे. पण किती काळ रामाच्या नावावर राजकारण करणार ?"

"उद्धव ठाकरे आणि शिवसेना नाशिकच्या काळाराम मंदीरात जाण्याचं निश्चित केल्यानंतर, ऐनवेळी पंतप्रधानांचा काळाराम मंदीराचा कार्यक्रम ठरतो. हे एकप्रकारे कुरघोडी केली असं दाखवण्याचा प्रकार आहे. आम्ही 22 तारखेनंतर अयोध्येतल्या राम मंदीरात जाणार आहोतच, पण सोबतच अशांत आणि हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यातल्या राममंदीरातही उद्धव ठाकरे आणि शिवसेना जाणार आहे. या निमित्ताने तरी मणिपूरमध्ये पंतप्रधानांची पावलं पडतील, मणिपूरमध्ये मोदी येतील आणि तिकडच्या समस्या पाहतील, असेही राऊत म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT