Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Dussehra Rally : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने निशाणा साधत ठाकरे गटाने फुंकले विधानसभेचे रणशिंग

Political News : शिवतीर्थावरील या दसरा मेळाव्याप्रसंगी ठाकरे गटाच्या नेत्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर तोफ डागताना राज्य सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते. या दसरा मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

शिवतीर्थावरील या दसरा मेळाव्याप्रसंगी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर तोफ डागताना राज्य सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगली. (Uddhav Thackeray News)

आगामी काळात राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील महिला सुरक्षा, हिंदूत्व, राज्य सरकारच्या योजना आणि निर्णय, राज्यातील प्रकल्प आरक्षणाचा मुद्दा या सगळ्या मुद्द्यावर भाष्य करताना आजच्या भाषणातून राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधत सरकारला घेरले.

प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार

प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर शस्त्रपूजन सोने वाटप आणि रावण दहन करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी ठाकरे म्हणाले, भाजपने केवळ मतांसाठी शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला आणि तो पाडला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. ते आपलं दैवत आहे. प्रत्येक राज्यात शिवाजी महाराज यांचा मंदिर उभारल गेले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि राज्याभिषेक दिवशी पुतळे साफ करायचा असा प्रेम नको. शिवाजी महाराज हे मतं मिळणारे यंत्र नाही, ते ईव्हीएम मशीन नाही. जो शिवाजी महाराज मंदिराला विरोध करेल त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

गद्दारला नेता मानून आमच्याशी लढावं लागतंय

मोहन भागवत यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण तुम्ही हिंदूनो एकत्र या सांगत आहात, पण तुमचे विश्वगुरु हिंदूचे रक्षण करू शकत नाही? तीनवेळा सरकार आले. तुम्हाला गद्दारी दिसली नाही, माझं सरकार खेचलं. 100 वर्ष आरएसएस झालं त्याचे चिंतन शिबीर घ्या. आता तुमचा भाजप नाही, हा हायब्रीड भाजप झाला आहे. इतर पक्षातील नेते भाजपच्या गर्भात बसले आहेत. भारतीय जनता पक्ष जनतेचा राहिला नाही. गद्दारला नेता मानून आमच्याशी लढावं लागतंय यातच तुमचा पराभव असल्याचेही ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT