Maratha Reservation Meeting : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : sarkarnama
मुंबई

Maratha Reservation Meeting : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरेंना निमंत्रण नाही !

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : सह्याद्री अथितिगृहावर सर्वपक्षीय बैठक, पण ठाकरे गटाच्या प्रमुखांना निमंत्रण नाही..

Chetan Zadpe

Mumbai News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या आज आठवा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज सकाळी १०.३० वाजता सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रित करण्यात न आल्याने सराकारने ठाकरे गटाकडे दुर्लक्ष केले, असे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सर्वसहमतीने आरक्षणावर सकारात्मक विचार करून तोडगा काढण्याची भूमिका ठेवण्यात येणार आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे.

मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन घ्यायंच का? मराठा आरक्षणाचे मार्ग देण्याचे मार्ग कोणकोणते आहेत? यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे. सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन यावर मार्ग काढण्याचा दृष्टीने यावर चर्चा होणार आहे.

यातील मुख्य गोष्ट म्हणजे या सर्वपक्षीय बैठकीला राज्यातला एक प्रमुख पक्ष शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रण दिले नसल्याची माहिती आहे. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सराकारवर कठोर टीका केली होती. विरोधी पक्ष म्हणून अंबादास दानवे यांना निमंत्रित केले गेले आहे, पण सर्वपक्षीय बैठकीत पक्ष म्हणून ठाकरे गटाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. यामुळे सरकारने या बैठकीसाठी ठाकरे गटाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार प्रारंभ -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनिल प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ. प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे, आदी उपस्थित आहेत. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT