Maratha Reservation : जरांगे पाटलांची मोठी मागणी होणार पूर्ण?; राज्य सरकारच्या हालचालींना वेग, फडणवीस राज्यपालांना भेटले

Manoj Jarange Patil Uposhan And Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे.
Manoj Jarange Maratha Reservation
Manoj Jarange Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती, तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीत मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं, याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. विशेष अधिवेशन घेण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे, पण राज्य सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Manoj Jarange Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मोठी अपडेट; जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत उपसमितीची होणारी बैठक रद्द!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आणि संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. ठिकठिकाणी रास्ता रोको आणि आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल निर्णय काय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही काल राज्यपाल यांची भेट घेतली होती. त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्यपालांकडे केली होती. विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे, विचारे, तायवाडेंनी ही मागणी केली होती.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनीही विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घ्यावं, अशी मागणी केली आहे. राज्यातील आमदार आणि अनेक नेत्यांनी ही मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यपालांकडून काही महत्त्वाच्या सूचना या राज्य सरकारला करण्यात येतील. आणि यासंदर्भातली अधिसूचनाही लवकरच काढण्यात येईल, असं बोललं जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

दरम्यान, मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मुंबईत उद्या सकाळी १०.३० वाजता सह्याद्री अतिथिगृहावर ही बैठक होणार आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीन आमदारांनी मंत्रालयाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. नीलेश लंके, कैलास पाटील आणि राजू नवघरे यांनी उपोषण सुरू केलं आहे.

Manoj Jarange Maratha Reservation
Uddhav On Maratha Andolan : ...तर मी शिंदे सरकारसोबत असेन, उद्धव ठाकरे यांनी केले महत्त्वाचे विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com