Sharad Pawar and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंमध्ये तासाभरापासून खलबतं; EVM, जेपीसी, अदानी, आंबेडकरांच्या मुद्यावर चर्चा?

Sharad Pawar, Uddhav Thackeray Meet : या बैठकीमध्ये राजकीय विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar-Uddhav Thackeray News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये गेल्या तासाभरापासून पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये राजकीय विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

या भेटीत आघाडीतील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच EVM, जेपीसी, उद्योगपती गौतम अदानी आणि महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सामावून घेण्यासंबंधीच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या विषयांवरुन महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून परस्पर मते व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे आघाडीला एकसंघ ठेवण्यासाठी तसेच आघाडीच्या अनेक सभा पुढील काही दिवसांमध्ये राज्यभरात होणार आहेत. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरच्या सभेपासून झाली आहे. या विषयावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून देखील ठाकरे गट आक्रमक झाल्यानतंर काँग्रेसची अडचण झाली आहे. या सगळ्यात पवारांनी मध्यस्थी करून विषय मिटवला असला तरी आता मतभेत दूर झालेत का हा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून मविआमध्ये सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. या सगळ्या मुद्यांवर पवार आणि ठाकरे यांच्यामध्ये खलबतं होण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT