Uddhav Thackeray Banner Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray PM Banner: उध्दव ठाकरे 'पंतप्रधान'पदाच्या शर्यतीत; 'मातोश्री' बाहेरच झळकला बॅनर !

Banner Of Uddhav Thackeray as Prime Minister In Matoshri Area: विरोधकांचा २०२४ साठी पंतप्रधानपदाचा चेहरा ठरलेला नसतानाच उध्दव ठाकरेंचा 'भावी पंतप्रधान' म्हणून बॅनर....

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राज्यात एकीकडे मुख्यमंत्री बदलाची चर्चा जोर धरु लागली असतानाच दिवसेंदिवस भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीतही भर पडू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे कधी काँग्रेसच्या नाना पटोलेंना भावी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसविले जात आहेत. तसे बॅनर उभारून समर्थक भावी मुख्यमंत्र्यांची स्पर्धाच भरवत आहेत.

अशात चार दिवसांपूर्वी अजितदादांचा असाच बॅनर थेट मातोश्रीपुढे उभारून शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना डिवचल्याची चर्चा होती. या स्पर्धेत ठाकरेंचे समर्थक 'शेरास सव्वाशेर' निघाले आणि उध्दवसाहेबांना थेट दिल्लीच्या राजकारणात उतरवून त्यांना 'भावी पंतप्रधान' केले. विशेष म्हणजे भाजप विरोधी आघाडीच्या नेतृत्वात उध्दव ठाकरे हे 'फ्रंट'ला आहेत. (Matoshri Prime Minister Banner)

याच पार्श्वभूमीवर आता 'मातोश्री'बाहेर माजी मंत्री मुख्यमंत्री शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून बॅनर झळकला आहे. त्यामुळे ठाकरेंचे पाऊल आता दिल्लीच्या दिशेने पडते आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या पुढाकाराने पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारविरोधात मोट बांधली आहेत. विरोधकांच्या दोन बैठका अनुक्रमे पाटणा आणि बेंगळूरु येथे पार पाडल्या. त्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शरद पवारांसह २६ पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते. यात उध्दव ठाकरेंचाही समावेश होता. आता विरोधकांची तिसरी महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्रातील मुंबई येथे होत आहे. या बैठकीसाठी ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.

विरोधकांच्या मुंबईतील बैठकीतून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर काहीसे बॅकफूटला गेलेल्या ठाकरे विरोधकांच्या बैठकीतून राज्यासह केंद्रातील भाजप सरकारविरोधातली धार आणखी आक्रमक करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र, एकीकडे विरोधकांचा २०२४ साठी पंतप्रधानपदाचा चेहरा ठरलेला नसतानाच मातोश्रीबाहेर उध्दव ठाकरेंचा 'भावी पंतप्रधान' म्हणून बॅनर झळकला आहेत.

बॅनरवर काय लिहिलंय..?

ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस असतो. या दिवशी राज्यभरातून ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. आता शिवसेनेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या 'मातोश्री'बाहेर ठाकरेंचा भावी पंतप्रधान उल्लेख असलेला बॅनर झळकला आहे. या बॅनरवर 'संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक(ShivSainik) सदस्य असलेला आम्हाला गर्व हिंदुत्वाचा' तसेच 'एक संयमी नेतृत्व' असा आशय लिहिला आहे. हा बॅनर ठाकरे समर्थकांनी लावला आहे. परंतू, या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT