Phaltan NCP News : अजितदादांनी फलटणमधील 20 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली...

Deepak Chavan स्थगिती उठवून कामांना मंजुरी व निधी दिल्याबद्दल आमदार दीपक चव्हाण यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले आहेत.
Ramraje Naik Nimbalkar, Deepak Chavan, Ajit Pawar
Ramraje Naik Nimbalkar, Deepak Chavan, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

-किरण बोळे

Phaltan NCP News : फलटण नगरपरिषद हद्दीतील ज्या विकास कामांना मंजूरी होती. त्यावर मागील सरकारने स्थगिती दिली होती. अशा सर्व विकास कामांना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून स्थिगिती उठवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच फलटण तालुक्याच्या विकासासाठी आगामी काळातही चांगला विकास निधी प्राप्त होईल, असा विश्वास आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला.

आमदार रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांच्या फलटण Phaltan येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दीपक चव्हाण Deepak Chavan बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांडूरंग गुंजवटे आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पात पुरवणी बजेटमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर झाली होती, परंतू त्यांना तत्कालीन सरकारने स्थगिती दिली होती. विद्यमान सरकारने या कामांवरील स्थगिती उठविली असल्याचे स्पष्ट करुन आमदार चव्हाण यांनी सांगितले.

स्थगिती उठविण्यात आल्याने फलटण शहर हद्दीतील वीस कोटी बत्तीस लाख रुपयांची कामे मार्गी लागणार असुन लवकरच या कामांना सुरुवात होईल. सदर कामांमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पाच कोटींच्या व महाराष्ट्र शासन वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंधरा कोटी अशा एकुण विस कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील काही अन्य विकास कामांनाही स्थगिती देण्यात आली होती.

Ramraje Naik Nimbalkar, Deepak Chavan, Ajit Pawar
Ramraje Naik Nimbalkar News : पक्षादेश आला तर माढ्यातून लढणार; पण, खासदार फलटणच्या वाड्यातलाच होणार...

याही कामांवरील स्थगिती उठविण्यात यावी यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. या कामांवरीलही स्थगिती उठेल व याबरोबरच आणखीन विकास कामांच्या मंजूरीची आम्ही मागणी केली असुन आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून लवकरच आणखी भरघोस विकास निधी प्राप्त होईल.

गत तीस वर्षात फलटण नगरपरिषद व तालुक्याचा मोठा कायापालट रामराजे यांच्या माध्यमातून झाला आहे. अनेक विकास कामे मार्गी लावल्याने आज फलटण शहरात ठोस विकास दिसत आहे व आगामी काळात अन्य विकास कामे पुर्णत्वास जातील, असा विश्वास व्यक्त करुन स्थगिती उठवून कामांना मंजुरी व निधी दिल्याबद्दल आमदार दीपक चव्हाण यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना फलटण तालुक्याच्यावतीने धन्यवाद दिले आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Deepak Chavan, Ajit Pawar
Satara BJP News : जागा वाटपाच्या तिढ्यावर आमदार गोरेंनी स्पष्टच सांगितले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com