Uddhav Thackeray, Eknath shinde
Uddhav Thackeray, Eknath shinde sarkarnama
मुंबई

NCP News : शिंदेच्या कमी लोकप्रियतेवरुन राष्ट्रवादीनं डिवचलं ; 'ठाकरेंच्या तुलनेत..

सरकारनामा ब्युरो

Eknath shinde News : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असे इंडिया टूडे –सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात समोर आले आहे. इंडिया टूडे – सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात देशभरात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहेत. पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले होते.

या सर्वेक्षणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत. या वरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंच्या तुलनेत शिंदे कमी लोकप्रिय असल्याचा टोलाही तपासे यांनी लगावला आहे.

महेश तपासे म्हणाले, "आज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना हे मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या वैधतेचा निकाल जेव्हा लागेल, त्यावेळी इंडिया टुडेच्या सर्व्हेतून आलेला ३४ खासदारांचा आकडा ४० च्या आसपास जाईल,"

सर्व्हेक्षणात एकनाथ शिंदे यांना फक्त दोन टक्के लोकांनी पसंती दिली. याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे, हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे असा टोला तपासे यांनी लगावला आहे.

इंडिया डुटे – सी वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार टॉप मुख्यंमत्री कोण?

  • भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

  • दुसऱ्या क्रमाकांवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून त्यांना १६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

  • तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून त्यांना सात टक्के लोकांनी पसंती दिली.

  • चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यंमत्री एम. के. स्टॅलिन, पाचव्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत,

  • सहाव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरम, सातव्या क्रमाकांवर शिवराज सिंह चौहान आहेत,

  • आठव्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT