BJP News : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, असं बावनकुळे का म्हणाले..

Chandrashekhar Bawankule News :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले शासन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत,
Chandrashekhar Bawankule, Prakash Ambedkar
Chandrashekhar Bawankule, Prakash Ambedkarsarkarnama

Chandrashekhar Bawankule News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी टीका केली आहे. आंबेडकरांच्या या टीकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यासह भाजप नेत्यांनीही आंबेडकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबेडकरांवर जहरी टीका केली आहे.

ठाकरे गटाशी वंचित विकास आघाडीशी युती केली आहे. या युतीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "उद्धव ठाकरेची किंचित आणि वंचित सेना एकत्र आलेले महाविकास आघाडीला मान्य नाही. मात्र,त्यांची आम्हाला अडचण नाही. आम्ही साऱ्यांनाच टक्कर देऊ. प्रकाश आंबेडकर मनुस्मृतीविषयी बोलत आहेत.मात्र, ते इतक्या लहान डोक्याचे आहेत. भाजपमध्ये सर्वाधिक आदिवासी, मागास वर्गाचे कार्यकर्ते आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले शासन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत,"

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मनुस्मृती सोडावी.आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, असे आव्हान आंबेडकरांनी दिले आहे. त्यावर बावनकुळेंनी आंबेडकरांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Chandrashekhar Bawankule, Prakash Ambedkar
Dada Bhuse News : ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदा ;दादा भुसेंचा अद्वय हिरेंवर हल्लाबोल

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले प्रशासन करीत आहेत.भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमध्ये सर्वाधिक मागास कार्यकर्ते आहेत. सर्वाधिक आदिवासी कार्यकर्ते आहेत. मात्र, हे आंबेडकरांना कळत नसेल, तर काय बोलणार," असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.

पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची खेळी असू शकते, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (शुक्रवारी) जयंत पाटलांच्या या विधानाचा समाचार घेतला. ते माध्यमांशी बोलत होते.

Chandrashekhar Bawankule, Prakash Ambedkar
BJP News : ..तर जयंत पाटील हे शरद पवारांना बदनाम करीत आहेत ; बावनकुळेंचा हल्लाबोल

दोन दिवसापूर्वी जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी विधान केलं होते. त्यानंतर यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. "भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते," असे जयंत पाटील म्हणाले होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "जयंत पाटील जर खरं बोलत असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे, शरद पवारांनी यापुढे असे राजकारण करु नये. शरद पवारांना हे शोभत नाही. जयंत पाटील यांचे म्हणणं खोटे असेल तर ते शरद पवार यांना बदनाम करीत आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com