Nana Patole-Uddhav Thackeray
Nana Patole-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

MVA CM News : राऊतांकडून मविआचा CM पदाचा चेहरा म्हणून ठाकरेंचं नाव पुढं; काँग्रेसचा 'या' दोनच शब्दांत रिप्लाय

Deepak Kulkarni

Mumbai Political News : महाविकास आघाडीचा लोकसभेतील दमदार कामगिरीनंतर कॉन्फिडन्स प्रचंड वाढला आहे. त्याचमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही आघाडीच असणार असल्याचा अंदाज बांधून आत्तापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना ठाकरे गट यांच्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

एकीकडे लोकसभा निवडणुकीत जागावाटपात वरचढ ठरलेल्या ठाकरे गटानं आता मविआचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून थेट उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव पुढं केलं आहे.त्यामुळे आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी थेट मुद्द्यालाच हात घालत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्याशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरू शकतं. लोकांनी याआधी उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे.ते महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते असा दावा करत मोठे संकेत दिले आहेत.

राऊत म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान केलं आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात.

त्याचबरोबर बिनचेहऱ्याचं सरकार किंवा बिनचेहऱ्याची आघाडी चालणार नाही असंही ते म्हणाले. एकप्रकारे राऊतांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे.

पण संजय राऊतांच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यांची ही भूमिका आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सावध प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी राऊतांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

पाटील म्हणाले, मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत बसून चर्चा करून निर्णय होणं आवश्यक असल्याचे सूचक विधान केले आहे.आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधकांसह मित्रपक्षांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी हातखंडा असलेल्या नाना पटोले यांनीही राऊतांच्या दाव्यावर अगदी दोन शब्दांतच प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी फक्त नो कमेंट्स म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT