Kundlik Khande News : मुंडे समर्थकांनी कार्यालय फोडल्यानंतर कुंडलिक खांडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Pankaja Munde Supporters Vandalized Kundlik Khande office : शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खांडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे.
Kundlik Khande
Kundlik KhandeSarkarnama

Beed News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आता महिना होत आला आहे. तरीदेखील या निकालाचे पडसाद अजूनही उमटत आहे.बीडमध्येही भाजपच्या पंकजा मुंडेंचा झालेला पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

त्यातच बीडमध्ये गुरुवारी (ता.27) एका लोकसभा निवडणुकीच्या काळातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंडे समर्थकांनी आता शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीनंतर आता खांडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खांडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे.ही तोडफोड मुंडे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख खांडे यांचे कार्यालय फोडल्यानंतर आता त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. ते त्यात ते म्हणतात, विस्थापित कुटुंबातून मी पुढे आलेलो आहे.मला आत्तापर्यंत अनेक अडचणीचा सामना करावा लागलेला आहे हे आपल्या सर्वांना माहितीच असल्याचंही त्यांनी सांगितले.

Kundlik Khande
Beed Breaking News : बीडमधून मोठी बातमी! l 'त्या' Viral Clip नंतर मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडेंचं ऑफिस फोडलंं

मी एका विस्थापित कुटुंबातून पुढे आलेलो आहे राजकारणामध्ये काम करत असताना दोष पूर्ण राजकारण कधीच केलं नाही. परंतु,आज सकाळपासून जे सुरू आहे ते मला राजकारणामध्ये बदनाम करण्याचा डाव आहे असल्याचा गंभीर आरोप खांडे यांनी केला आहे.

त्यातच हा सायंकाळी माझं ऑफिस फोडण्यात आलं. परंतु असल्या कटकारस्थानांनी मी कधीच खचून जाणार नाही. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये जे प्रामाणिक काम केलं आहे. ते मी यापुढेही सुरूच ठेवेल असं कुंडलिक खांडे यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

कथित ऑडिओ क्लिप काय ..?

व्हायरल झालेली कथित ऑडिओ क्लिप ही बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची असल्याची चर्चा आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना (Bajrang Sonwane) मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे देत आहेत.

तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. त्यामुळे याची बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत. या कथित ऑडिओची कोणतीही पुष्टी सरकारनामा घेत नाही.

Kundlik Khande
NCP Vs BJP in Pune : अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याची फडणवीसांकडे मोठी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणेंकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा निवडणुकीत 6 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.मुंडेंचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे.या पराभवामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी आत्महत्याच्या घटना घडल्या.तर मुंडेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील पाथर्डी,शिरुर,परळीसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पुकारण्यात आला होता.त्यातच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे वातावरण आणखी तापणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com