Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकारण तापू लागलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूने यंदाची लढत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये.
त्यातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतरही ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले असा खळबळजनक दावा शिंदे गटाच्या नेत्याकडून करण्यात आला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट संतापण्याची शक्यता आहे.
भाजप- शिवसेनेनं 2019 ची निवडणूक युतीमध्ये लढवली होती. पण निकालानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात सर्वाधिक आमदार निवडून येऊनही सत्तेबाहेर ठेवले होते.तसेच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली होती.
पण आता सिडकोचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा दावा करण्यात आल्याने नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाविषयी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, 2019 च्या निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले होते. त्यावेळी सर्व काही ठरले होते.
पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देण्याचंही भाजपकडून मान्य करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी चर्चेसाठी कुणीतरी माणूस पाठवण्याची विनंती करण्यात आली होती. पण ठाकरेंनी चर्चेसाठी कुणालाही पाठवलं नाही असं शिरसाट यांनी सांगितलं आहे.
यावेळी संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवरही गंभीर आरोप करण्यात आली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना जर भाजपसोबत जायचे नव्हते, तर मग इतका आटापिटा का आणि कशासाठी केला होता.पण त्यांनी पदासाठीच हे सर्व केले आणि त्याला राऊतच कारणीभूत आहे,असं शिरसाट यांनी केलं आहेत. याचवेळी एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु होते.पण,तुला जायचं तर तू जा असं शिंदेंना सांगण्यात आलं होतं
शिरसाट म्हणाले,तुमच्याकडे लाचारांची फौज तयार झाली आहे. लाचारी करुन आपल्याला मिळेल ते घेणे एवढेच काम ठाकरे गटाचे आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा.आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला चकरा मारत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या स्वाभिमानाची फौज होती ती आता राहिली नाही, असा हल्लाबोल शिरसाट यांनी केली.
मुंबईतील एका पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसाठी परतीचे दोर कापले आहेत असं स्पष्ट केलं होतं.यावर आता शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, डुबणाऱ्या पक्षाकडे कुणीही जात नाही. तुमच्याकडे परत यायला कोण तयार आहे? तुमच्याकडे कुणी आले पाहिजे ना, आम्ही तुमच्याकडे येणार नाही.एखादा नगरसेवक किंवा कार्यकर्ता तोही उमेदवारीचे तिकीट घेऊन आला असेल.पण आम्हाला तुमच्या दरवाजा किंवा पक्षात यायचे नाही,असे शिरसाट म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.