Harshavardhan Patil : जयंतरावांची ऑफर अन् सुळेंना लोकसभेला अदृश्य मदत; 'तुतारी' हाती घेताच हर्षवर्धन पाटलांची जोरदार बॅटिंग

Harshavardhan Patil Join Sharad Pawar NCP : अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत तुतारी हाती घेतली आहे. हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरातून दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते.
Harshavardhan Patil
Harshavardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

अनेक दिवसांपासून होय-नाही म्हणत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर 'तुतारी' हाती घेतली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापुरातील बाजार समितीच्या मैदानात झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात 'परिवर्तन' होण्याचा विश्वास व्यक्त करत जोरदार 'बॅटिंग' केली आहे. तसेच, शरद पवार 'बिग बॉस' आहेत, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केलं आहे.

हर्षवर्धन पाटील ( Harshavardhan Patil ) म्हणाले, "जयंत पाटील जेव्हा, जेव्हा भेटायचे तेव्हा म्हणायचे, का थांबलाय तिथे ( भाजपत ) या इकडे.. शेवटी कोणत्याही गोष्टीला योग लागतो. मात्र, मी व्यक्तीगत राजकारणासाठी निर्णय घेत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली. कार्यकर्त्यांनी 'तुतारी' घेण्याचा आग्रह धरल्यामुळे पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला."

"सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आमच्या भगिनी आहेत. सुप्रिया सुळे चारवेळा खासदार झाल्या, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यात तीनवेळा खासदार करण्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा सहभाग हा अदृश्य होता," असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत मदत केल्याचं स्पष्ट केलं.

Harshavardhan Patil
Supriya Sule : नाराजांची मनधरणी करण्यात सुळेंचे प्रयत्न निष्फळ; हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशास तीन बड्या नेत्यांची दांडी

"शरद पवार पक्षसंघटनेची किंवा कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी देतील, ती पार पाडेल. हर्षवर्धन पाटील हा शब्दाचा पक्का आहे. खोटे हे लवकर पटते, मात्र दीर्घकाळ टीकत नाही. सत्य कदाचित लवकर पटत नाही. मात्र, सत्य दीर्घकाळ टीकते, ही राजकीय शिकवण मिळाली आहे," असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.

Harshavardhan Patil
Ajit Pawar : अजितदादांचं ठरलं! बारामती नव्हे, तर 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

"10 वर्षे अन्याय झाला. गावा-गावांमधील कार्यकर्त्यांना दोन ते तीन वर्षांत खूप त्रास झाला. तालुक्यात कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही. नवीन वर्ग या भागात तयार झाला आहे. रोहित पवार यांनी त्याला 'मलिदा गँग', असा शब्द वापरला आहे. मात्र, यंदा इंदापूर तालुक्यातील जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com