Uddhav Thackeray.jpg Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : मविआचं जागावाटप 'पेंडिंग'; पण ठाकरेंचे 22 उमेदवारही झाले 'फिक्स'?

Mahavikas Aaghadi Seat Allotment : दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 36 मतदारसंघापैकी 20 ते 22 जागांसाठी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे.लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना 22 पैकी 9 जागा जिंकल्या होत्या.हे यश ज्या कॉन्फिडन्सने ठाकरेंनी महाविकास आघाडीत जागांची डिमांड केली होती.त्याप्रमाणात जिंकलेल्या जागा यथातथाच होत्या.काँग्रेसने 17 पैकी 13 जागा जिंकत सुपरस्ट्राईकने आघाडीत आपण मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिले.

पण आता पुन्हा एकदा विधानसभेला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जोर लावला आहे. यात मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून फिक्स नसतानाच शिवसेना ठाकरे गटाने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादीही तयार केल्याची चर्चा आहे.सध्या 22 उमेदवारांची नावांची यादी समोर आली आहे.

मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वापासून ते उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळापर्यंत शिवसेनेनं (Shivsena) मुंबईसाठी कायमच ताकद लावली आहे. युती असो वा आघाडी, लोकसभा असो की विधानसभा निवडणुका ठाकरेंकडून मुंबईतील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्र वापरण्यात येते.

दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 36 मतदारसंघापैकी 20 ते 22 जागांसाठी महाविकास आघाडीत फिल्डिंग लावली आहे.ठाकरे गटाचे 22 जण मुंबईतील विविध मतदारसंघातून विधानसभेच्या आखाड्यात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.

वरळी मतदारसंघातून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे,दहिसरमधून दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर,वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई,दिंडोशीमधून सुनील प्रभू,विक्रोळीत सुनील राऊत, लोकसभा लढवलेले अमोल कीर्तिकर यांना जोगेश्वरी मतदारसंघातून संधी मिळू शकते.दादर-माहिम मतदारसंघातून सचिन अहिर, विशाखा राऊत यांच्या नावांवर खलबतं सुरू आहेत.

तसेच अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके,कलिनातून संजय पोतनीस,मागाठाणे-विलास पोतनीस संजना घाडी,वर्सोवा- राजू पेडणेकर,राजूल पटेल,शिवडी -अजय चौधरी/सुधीर साळवी,कुर्ला- प्रविणा मोरजकर,वडाळा – श्रद्धा जाधव,चारकोप – नीरव बारोट,गोरेगाव – समीर देसाई यांचा समावेश आहे.

भांडूप – रमेश कोरगांवकर,चांदिवली – ईश्वर तायडे,भायखळा -किशोरी पेडणेकर/रमाकांत रहाटे, चेंबुर - अनिल पाटणकर, प्रकाश फार्तेपेकर,अणुशक्तीनगर -प्रमोद शिंदे ,विठ्ठल लोकरे, घाटकोपर -सुरेश पाटील अशी ठाकरे गटाचा डोळा असलेले संभाव्य मतदारसंघ आणि त्यातून लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची नावे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT