Uddhav Thackeray Ekanth Shinde Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : मोठी बातमी! पुन्हा ठाकरेंच्या पदरी निराशा; पक्ष अन् चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली

Shivsena Hearing In Supreme Court : भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपल्याकडे असलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर थेट शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरच दावा ठोकला होता.

Deepak Kulkarni

Mumbai News : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. त्यानंतर शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही बहाल केलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली आहे.

याच याचिकेवर 14 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी पुढे ढकलली असून आता ती 17 सप्टेंबरला होणार आहे.त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असल्याचे बोलले जात आहेत.

भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपल्याकडे असलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर थेट शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरच दावा ठोकला होता.

यावर निकाल देताना निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं होतं. तर ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं होतं.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी गेले कित्येक महिने सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली नाही. त्यामुळे 14 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचे लक्ष लागले होते. मात्र, आता न्यायालयाने ही सुनावणी जवळपास पुन्हा महिनाभर पुढे ढकलली आहे. ती आता 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. या सुनावणीबाबत न्यायालयाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील वर्षी फूट पडली होती.अजित पवार हे आपल्या काही आमदारांसह भाजप - शिंदे शिवसेनेच्या सरकारमध्ये सामील झाले होते.त्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आण घड्याळ चिन्हावर दावा ठोकला होता.केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला संख्याबळाच्या जोरावर पक्ष आणि चिन्ह बहाल केले होते. आता सुप्रीम कोर्टात या प्रकरणी मंगळवारी (ता. 13)सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्हं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या सुनावणीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्हीही गटाचे लक्ष लागलेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT