Uttam Jankar : मोहोळच्या मालकाचा गडी व्हायला वेळ लागणार नाही; जानकरांनी राजन पाटलांना धू धू धुतले

Former MLA Rajan Patil : मोहिते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी तहसील कार्यालय अकलूजला आणले नाही. मात्र, 4-5 हजारांचे खेडेगाव असणाऱ्या अनगरला तहसील कार्यालय आणण्याचा प्रयत्न होतोय.
Uttam Jankar-  Rajan Patil
Uttam Jankar- Rajan Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 August : मोहोळ तालुक्यातील 42 गावांची होरपळ करून अप्पर तहसील कार्यालय अनगरला घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय. लोकसभा निवडणुकीत 63 हजार लोकांनी चाबकाचे फाटकारे मारले आहेत. मोहिते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी तहसील कार्यालय अकलूजला आणले नाही. मात्र, 4-5 हजारांचे खेडेगाव असणाऱ्या अनगरला तहसील कार्यालय आणण्याचा प्रयत्न होतोय.

या मालकाचा गाडी व्हायला वेळ लागत नाही, अशी खरमरीत टीका उत्तम जानकर यांनी नाव न घेता मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केली.

मोहोळ येथील शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात उत्तम जानकर (Uttam Jankar) बोलत होते. ते म्हणाले, उद्याच्या निवडणुकीत 11 पैकी 10 आमदार बदलू शकतात, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे. मोहोळ तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे आता मोहोळमध्ये परिवर्तन होणार आहे.

ज्यांना आपण मालक केलं, ज्यांना आपल्या ताटात जेवायला घातले, ते आपल्याच ताटात शू करून जातोय आणि त्यांचा मालक तिकडे धरण भरत आहे, अशा शब्दांत नाव न घेता माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जानकरांनी टीका केली.

इथल्या कोणा मालकाला वाटत असेल की पालखीबरोबर आपला घोडा ताजसाज होईल. मात्र, घोड्याच्या परतीच्या प्रवासावेळी त्याचा मालक चाबूक घेऊन मागे येतो, तशी अवस्था तुमच्या तालुक्याच्या मालकाची होणार आहे. त्या मालकाच्या महामेळाव्यात 20 हजारपैकी 19 हजार खुर्च्या रिकाम्या होत्या, असा दावाही जानकर यांनी केला.

Uttam Jankar-  Rajan Patil
Shiva Swarajya Yatra : जयंत पाटलांनी सांगितले मोहोळमधील विजयाचे गणित; महाआघाडीच्या नेत्यांना दिला 'हा' सल्ला

जानकर म्हणाले, मराठा समाज आरक्षणासाठी आक्रोश करतोय. तुम्ही मराठा समाजाचे आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही. धनगर समाजाचा आरक्षणचा प्रश्नही हे सोडवत नाहीत. पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो म्हणाले होते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे. आता त्याचे अधिकार राज्याला दिलेले आहेत.

बारामती, सातारा आणि नागपूरच्या राज्यकर्त्यांना माझा इशारा आहे. मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर या राज्यातून तुम्ही हद्दपार व्हाल.

माळशिरसला मागच्या वेळेस बीडवरून आणून उभा केला होता. यावेळी नागपूरहून आणून उभा करा. त्याला बिनविरोध निवडून देऊ, मात्र आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा नायतर तुम्हाला सुटी नाय, असा इशाराही जानकर यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला.

Uttam Jankar-  Rajan Patil
Ajit Pawar CM Post : अजित पवार महाआघाडीसोबत असते तर मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांचे सूचक विधान

लोकसभेला आपल्या विरोधात जे होते, तेच आताही विरोधात असतील आणि मोहोळच तिकीट हे भूमिपुत्रालाच दिले जाईल. त्यामुळे मोहोळचं अग्या मोहोळ आता उठवल्याशिवाय राहायचं नाही, असेही जानकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com