Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा विधानसभेला सामोरे जाण्याआधी सर्वात मोठा डाव; आयोगाकडे 'ही' मोठी मागणी

Uddhav Thackeray Letter to Election Commission : शिवसेना (ठाकरे गट) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमकबाणा घेत भाजपसह शिंदे गटाला ललकारलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा सांगणं सध्यातरी महाकठीण काम होऊन बसलं आहे. पडद्यामागील नाट्यमय घडामोडींनी वेग पकडला आहे. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतरही लोकसभेला महाराष्ट्रात भाजपसह महायुतीला जोरदार फटका बसला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत लोकसभेला मोठं यश मिळवलं होतं.

आता हाच ट्रेंड ते विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच मोठा डाव टाकला आहे. त्यांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमकबाणा घेत भाजपसह शिंदे गटाला ललकारलं आहे. तसेच त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना ठाकरे गटानं मशाल चिन्हावरच लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पत्रच निवडणूक आयोगाला पाठवलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभेला मिळालेल्या यशानंतर आता शिवसैनिकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यांनी आता केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission) पाठवत मोठी मागणी केली आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाने आम्ही आगामी निवडणुका मशाल चिन्हावरच लढणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आमच्या मशाल चिन्हाला मान्यता द्यावी असं त्या पत्रात नमूद केलं आहे.

आपल्या पक्षाच्या चिन्हाला साधर्म्य असणारं दुसऱ्या कुणाचं चिन्हं असेल तर आपल्याला फटका बसू शकतो.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मशालीशी साधर्म्य असलेलं इतर चिन्हं मतपत्रिकेत ठेवू नये, अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचं तुतारी वाजवणारा माणूस तर काही उमेदवारांचं पिपाणी हे चिन्हं होतं. या दोन्ही चिन्हात साधर्म्य असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडा्ल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांना फटका बसल्याचा दावा केला होता.

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती करत यापुढे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशी साधर्म्य असणारं चिन्ह कोणत्याही उमेदवाराला देणार नसल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडूनही तशीच विनंती निवडणूक आयोगात करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT