Rane vs Thackeray Sarkarnama
मुंबई

Rane vs Thackeray: Video राजकोट किल्ल्यावर राडा; शिवद्रोही कोण? उद्धव ठाकरे कडाडले

Shivaji Maharaj Statue Controversy Rajkot Malvan:आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता नारायण राणे आणि नीलेश राणे हेही किल्ल्यावर पोहचले होते. त्यावेळी राणे-ठाकरेंचे समर्थक एकमेकांवर धावून गेल्याने राडा झाला.

सरकारनामा ब्यूरो

Malvan: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा (Shivaji Maharaj Statue) कोसळण्याने देशभरात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मालवण बंद पुकारण्यात आला आहे

राजकोट किल्ल्यावर राणे-ठाकरेंचे समर्थक एकमेकांवर धावून गेल्याने राडा झाला. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर तोफ डागली. महायुतीत शिवद्रोह ठासून भरला असून किल्ल्यावर राडा घालणारे शिवद्रोही असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता भाजपचे खासदार , माजी मंत्री नारायण राणे आणि नीलेश राणे हेही किल्ल्यावर पोहचले होते. त्यावेळी राणे-ठाकरेंचे समर्थक एकमेकांवर धावून गेल्याने राडा झाला.

राजकोट किल्ल्यावर राडा घालणारे शिवद्रोही कोण आहेत, हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसले आहेत. आदित्य ठाकरे किल्ल्यावर जात असताना मोदी-शहांच्या दलालांनी त्यांचा रस्ता अडवला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून येत्या रविवारी मुंबईत 'जोडे मारो आंदोलन' करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुतळा कोसळल्यामुळे नवीन मोठा पुतळा करण्याची संधी मिळाली, असे वादग्रस्त विधान केले. केसरकर यांच्या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकारावर सरकारने गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT