uddhav thackeray sarkarnama
मुंबई

Video Uddhav Thackeray : मला भाजपसोबत जायचं आहे, पण...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'प्लॅन'

Akshay Sabale

पक्ष फुटला, शिवसेना नाव आणि चिन्ह गेलं, तरीही उद्धव ठाकरे यांनी हार मानली नाही. लोकसभा निवडणुकीत पायाला भिंगरी लावून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. 18 पैकी 9 जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले.

पक्ष फुटल्यानंतरही मतदार उद्धव ठाकरेंच्या मागे असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करतील, असं बोललं जात होतं. पण, या चर्चेंची उद्धव ठाकरेंनी हवाच काढला आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आणि विधानसभेच्यादृष्टीनं मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते, बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

ठाकरे कधीतरी 'एनडीए'सोबत परत येतील, असा 'नरेटिव्ह' सेट केला जातोय. याबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "ठिकंय... मला भाजपसोबत जायचं आहे. पण, यांच्यात बसून हो सांगू का?"

उद्धव ठाकरेंनी केलेल्या या मिश्किल विधानानंतर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये हशा पिकला. यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

"संपूर्ण देशानं मोदींना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसे त्यांचं पंतप्रधानपद वाचलं आहे. किती दिवस हे सरकार राहिल सांगता येत नाही. गुजरातमध्ये भाजप चालूगिरी करायला लागले, तर त्यांचं मूळ राज्य आहे, तिथेच त्यांच्या आसऱ्याला सुरुंग लागेल. भाजपत खरेपणा राहिला नाही. त्यांचा फोलपणा देशातील जनतेच्या लक्षात आला आहे. देशातील जनता जागी झाली आणि आणखी काही लोकांचा विश्वास भाजपवर होता, तो उडालेला आहे," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"जिथे-जिथे रामाचं वास्तव्य होतं. तिथे भाजपनं सपाटून मार खालला आहे. आता भाजपमुक्त राम झाला आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. तसेच, "सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही," असं ठाकरेंनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT