Jalna Maratha Protest  Sarkarnama
मुंबई

Jalna Maratha Protest : आंदोलनाची 'दोन फुल - एक हाफ' ना कल्पना नव्हती का ? ठाकरेंचे शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र

Maratha reservation : हुकुमशाही चिरडून टाकण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहोत.

Mangesh Mahale

Mumbai : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे. 'दोन फुल- एक हाफ' ना आंदोलनाची कल्पना नव्हती का ? असा उल्लेख करीत ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र सोडले.

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यावर बोलताना ठाकरेंची जीभ घसरली. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली. जालन्यात पोलिसांनी केलेला लाठीमार चुकीचा आहे. सरकार आता फक्त सखल चौकशीचा फार्स सुरु करतील. या आंदोलनाची दोन फूल-एक हाफना कल्पना नव्हती का ? अशी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली.

ठाकरे म्हणाले, ""मी मुख्यमंत्री असताना रोज कुठे काय सुरू आहे याची माहिती मला दिली जायची. गृहमंत्र्यांना तर अशा आंदोलनाची माहिती असतेच असते. मग यांना माहीत नव्हती का? बारसूतही असाच लाठीमार झाला होता. त्यावेळी मी बारसूला गेलो होतो. आंदोलकांची भेट घेतली होती. जालन्यात आंदोलकांवर लाठी हल्ला झाला. पण यांचा एक मंत्रीही तिकडे फिरकला नाही,"

खोक्यातून जन्माला आलेले सरकार...

"राज्यातील सरकार खोक्यातून जन्माला आलेले आहे. भाजप म्हणजे भाडेतत्वावर जमवलेला पक्ष आहे. इंडिया आघाडी ही व्यक्तीविरोधात नाही. हुकुमशाही चिरडून टाकण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहोत," असे ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले, "गणेशोत्सवाच्या काळातच मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलवले आहे. सणाच्या काळात अधिवेशन बोलवण्याची गरज होती का? या अधिवेशनात आरक्षणाचा विषय निकाली काढा,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT