Uddhav Thackeray vs Modi Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Challenge to Modi : उद्धव ठाकरेंचं मोदींना 'Open Challenge' ; म्हणाले 'विधानसभेच्या तयारीला आताच लागा, फक्त...'

Shinde vs Thackeray : '...नाहीतर षंढ म्हणून गावभर फिरा, विजेते म्हणून फिरू नका.' असंही उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Shivsena Foundation Day 2024 : शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला. यानिमित्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने वरळीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या दोन्ही कार्यक्रमात नेत्यांची जोरदार भाषण झाली. विरोधी गटावर आक्रमकपणे टीका केली गेली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच खुलं आव्हान दिलं.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले, 'आमच्यावर जेव्हा तुम्ही बोटं दाखवतात, तेव्हा तुमचं कर्तृत्व हे लोकांनी बघितलं नाही असं नाही. जनतेने सगंळं बघितलेलं आहे, म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे.'

'मी मिंध्यांना सांगतोय, भाजपला सांगतोय, मी आज त्यांना पुन्हा आव्हान देतोय जर तुम्ही षंढ नसाल, तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं नाव न लावता, धनुष्यबाण न लावता माझ्यासोर निवडणूक लढवून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून गावभर फिरा, विजेते म्हणून फिरू नका. एका गोष्टीचा मला अभिमान जरुर आहे. यावेळी आम्ही शिवसेना प्रमुखांशिवाय दुसरा कुणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढेही वापरणार नाही. मोदींचा तर अजिबातच नाही.'

याचबरोबर 'मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय, विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आतापासूनच सुरू करा. मी आहे आणि तुम्ही आहात, फक्त या षंढांना बाजूला ठेवा. नाव चोरायचं नाही, वडील चोरायचे नाहीत. धनुष्यबाण चोरायचा नाही. धनुष्याबाण बाजूला ठेवा, नवीन निशाणी घ्या. मिंध्यांच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर. अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगतात तुम्ही? षंढ कुठले. यांच्याकडून काही आपल्या राज्याचं भविष्य होणार आहे?' असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

शहरी नक्षलवादावरून एकनाथ शिंदेंवर टीका -

उद्धव ठाकरे म्हणाले, 'मिंधे जे बोलले शहरी नक्षलवाद. शहरी नक्षलवाद? हुकूमशाही तोडा, मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा. हा प्रचार तुम्हाला नक्षलवाद वाटतोय, हा तुम्हा दहशतवाद वाटतोय का? लोकशाही वाचवा हा दहशतवाद असेल तर मी दहशतवादी आहे. देश वाचवा, देशाचं संविधान वाचवा हा दहशतवाद असेल तर मी दहशतवादी आहे. पण तुमचे जे बापजादे दिल्लीत बसलेले आहेत.'

तसेच 'मोदी आणि शाह ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांना पाठवतात. दमदाट्या करून, तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षांतर करवतात, पैशांची लालुच दाखवतात.

हा तुमचा नक्षलवाद नाही तर मग दुसरं काय आहे? हा शासकीय नक्षलवाद आहे का? हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं, विरोधी पक्ष मोडून काढायचे, चांगली चाललेली सरकार पाडून टाकायची आणि स्वत:च्या पक्षात घेवून त्यांना मंत्रिपदं द्यायची. हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे. नक्षलवादी तुम्ही आहात. '

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT