Uddhav Thackeray 0n Shivsena Foundation Day : 'पुन्हा मोदींसोबत जाणार का?' उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Uddhav Thackeray on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवरही दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena Foundation Day 2024 : शिवसेनेच्या (Shivsena) 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाय, उद्धव ठाकरे पुन्हा मोदींसोबत जाणार का? या चर्चांवरही भूमिका स्पष्ट केली. एवढंच नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली.

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, 'लोकसभा निवडणूक निकालानंतर आपल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त होत असलेला हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. मी सर्वांना शिवसेना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आहे. मागील आठवड्यात महाविकास आघाडीची एक पत्रकारपरिषद झाली. त्याचवेळी मी सर्व मित्र पक्षांना धन्यवाद दिलेले आहेत. परंतु आज पुन्हा एकदा शिवसेनेच्यावतीने ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेला मतदान केलं, आशीर्वाद दिले त्या सर्वांना मी धन्यवाद देतो.'

Uddhav Thackeray
Sanjay Raut News : आमच्या शिवसेनेला 58 वर्षे पूर्ण तर त्यांची अडीच वर्ष; संजय राऊतांनी लगावला टोला

'यशाचा मानकरी मीच आहे मी कधीही मानणार नाही, यशाचे मानकरी, धनी हे तुम्ही आहात. कारण, शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या, आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे की होय मी करू शकतो, मी यांना पाडू शकतो. हा आत्मविश्वास आहे. पण मी एकटाच हे करू शकतो, जगात दुसरं कोणीच करु शकत नाही. हा अहंकार आहे, जो मोदींमध्ये आहे.'

'निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे. भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे. पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं, विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलेलं आहे. म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदींसोबत जाणार.

एनडीएमध्ये जाणार. जायचं का? ज्यांनी आपल्याला संपवायचा प्रयत्न केला. आपल्या मातेसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं का? ते गैरसमज पसरवून देत आहेत आणि स्वत:चं अपयश झाकून ठेवत आहेत. तुमचं काय काय उघडं पडलंय हे तुम्ही बघा.'

Uddhav Thackeray
Video Bhaskar Jadav : उद्धव ठाकरेंचा स्ट्राइक रेट 200, आमचा नाद नाय करायचा; भास्कर जाधवांनी ठणकावले

'आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार. मलाही प्रश्न विचारले गेले. मी म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोलले आहेत का? नाही. मी भुजबळांशी बोललोय? नाही. भुजबळ माझ्याशी बोललेत? मग कशाला तुम्हाला या नसत्या उचापात्या करायच्या आहेत. ते आहेत मंत्री आहेत, त्यांचं ते बघतील. प्रत्येकजण समजदार आहे. ते त्यांच्या वाटेने चालले आहेत, आम्ही आमच्या वाटेने चाललो आहोत. पण तुम्ही ही जी काय सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहात. त्यातून तुमचं अपयश झाकण्याचे प्रयत्न करतात.'

'मी आज सगळ्यांचा सत्कार केला. खासदारांचा तर केलाच परंतु माझ्या योद्ध्यांचाही केला आणि तो एवढ्यासाठी केला, सांगता येत नाही मध्यावधी निवडणूक कधीही लागली तर त्यावेळी तुम्ही खासदार होणार आहात. हे सरकार चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे. सरकार चालेल का, सरकार पडले का? नव्हे पडलंच पाहीजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहीजे. नाहीतर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com