Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "देशातून मोदी-शाह-फडणवीस नावं पुसली जातील पण ठाकरे-पवार हे ब्रँड..."; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On MNS ShivSena Alliance : "ठाकरे ब्रँड कधी संपणार नाही. ईस्ट इंडिया कंपनी सुरतचे मालक म्हणताय की, जोपर्यंत पवार आणि ठाकरे ब्रँड संपत नाही, तोपर्यंत मुंबई आपल्याकडे घेता येणार नाही. पण मी सांगतो, या देशातून मोदी, फडणवीस, शाह ही नावं पुसली जातील."

Jagdish Patil

Mumbai News, 24 May : "या देशातून मोदी, फडणवीस, शाह ही नावं पुसली जातील. पण ठाकरे आणि पवार हे ब्रँड कायम राहतील, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना ठाकरे पवार हे ब्रँड संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, ते संपणार नाहीत असं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर आता राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाय यावेळी त्यांनी मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकण्यासाठी उद्धव ठाकरे तयार असून ती त्यांची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "ठाकरे ब्रँड कधी संपणार नाही. ईस्ट इंडिया कंपनी सुरतचे मालक म्हणताय की, जोपर्यंत पवार आणि ठाकरे ब्रँड संपत नाही, तोपर्यंत मुंबई आपल्याकडे घेता येणार नाही. पण मी सांगतो, या देशातून मोदी, फडणवीस, शाह ही नावं पुसली जातील.

कारण त्यांनी देशासाठी काहीच केलं नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भरीव काम केलं आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे ब्रँडच राहतील." दरम्यान, यावेळी त्यांनी मनसे शिवसेना युतीवर भाष्य केलं.

मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरेंची भूमिका असून त्याबाबत माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा झालेली आहे. त्यावेळी त्यांनी आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं राऊतांनी सांगितलं. शिवाय मराठी माणसासाठी एकत्र येणं हीच खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मानवंदना ठरेल, असंही राऊत यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT